Join us  

PHOTOS : आमिरनं केलं कलश पूजन, एक्स-वाईफ किरण रावसोबत केली आरती, काय आहे प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 12:56 PM

1 / 8
‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने काही काळ ब्रेक घेतला आहे. तूर्तास आमिर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे.
2 / 8
होय, आमिरच्या कलश पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये नुकतीच ही कलश पूजा झाली.
3 / 8
‘लाल सिंग चड्ढा’चे दिग्दर्शक अद्वैत चंदनने आमिरच्या कलश पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत. यात आमिर पूजा करताना दिसतोय.
4 / 8
आमिर आणि त्याची एक्स वाईफ किरण राव यांच्यासोबत आमिर खान प्रोडक्शन्सच्या स्टाफ मेंबर्सनं देखील या पूजेला हजेरी लावली. या फोटोला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
5 / 8
हिंदू पद्धतीने आमिर खानने अगदी विधीवत पूजा केली. यावेळी त्याने डोक्यावर टोपी घातली होती. गळ्यात उपरणं असा त्याचा लुक होता.
6 / 8
यावेळी आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव यांनी एकत्र आरती देखील केली. दोघंही आरती करताना फोटोत दिसत आहेत.
7 / 8
आमिर व किरणचे एकत्र पूजा अर्चा करतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आमिर काय नवं सुरू करतोय? हे जाणून घेण्याची उत्सुकताही आहेच.
8 / 8
यावेळी आमिर व अद्वैतच्या टीमचे अनेक लोक पूजेत सामील झालेले दिसले. आमिर लवरकच एका प्रोजेक्टवर काम सुरू करणार असल्याचं मानलं जात आहे.
टॅग्स :आमिर खानलाल सिंग चड्ढाकिरण रावबॉलिवूड