Join us  

इंडस्ट्री सोडून न्युझिलंडमध्ये स्थायिक झाली मराठी अभिनेत्री; आज युट्यूबर म्हणून कमावतीये नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 1:15 PM

1 / 8
छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे अग्गंबाई सासूबाई. ही मालिका संपून बराच काळ झाला आहे. मात्र, आजही त्यातील कलाकार चर्चेत येतात.
2 / 8
या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ, उमा पेंढारकर आणि गिरीष ओक मुख्य भूमिकेत झळकले होते. यात सध्या उमा पेंढारकर हिची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
3 / 8
अग्गबाई सूनबाई या मालिकेत उमाने ‘शुभ्रा’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेप्रमाणेच उमा स्वामिनी, योग योगेश्वर जयशंकर यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. मात्र, अलिकडेच तिने इंडस्ट्रीला रामराम केला केला.
4 / 8
उमा अभिनेत्री असण्यासोबतच एक काऊंसिलर आहे. उमाने तिच्या फिल्मी करिअरला ब्रेक देत ती कायमस्वरुपीत न्युझिलंडला स्थायिक झाली आहे.
5 / 8
उमा तिच्या नवऱ्यासोबत विदेशात स्थायिक झाली आहे. उमाने अभिनयातून जरी ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
6 / 8
उमा न्युझिलंडमध्ये असूनही युट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली आहे. U MAtter असं तिच्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती स्कीनकेअर, आरोग्य याबद्दल व्हिडीओ पोस्ट करत असते.
7 / 8
उमाच्या या यु-ट्यूब चॅनलने नुकतंच १ लाख सब्सक्रायबर्सचा टप्पा पार केला आहे.
8 / 8
उमा न्युझिलंडमधील अनेक नवनवीन ठिकाणांना भेट देत असते इथले फोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकारनिवेदिता सराफगिरिश ओक