लंडनच्या मराठी नाट्य रसिकांसाठी यंदाचा डॉ. महेश पटवर्धन आयोजित 'गर्जा महाराष्ट्र माझा' हा कार्यक्रम स्मरणीय ठरलाच, तसा या कार्यक्रमात सहभाग नोंदवणाºया कलाकारांसाठीही या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेली लंडनवारी आणि यादरम्यान पटवर्धन यांच्या घरचा पाहुणचार संस्मरणीय ठरला. मराठमोळा गायक अवधूत गुप्ते याने याबाबत सांगितले. तो म्हणाला, सर्व कलाकार कार्यक्रमाआधी पटवर्धनांच्या घरी जमले आणि घरच्या जेवणावर मस्तपैकी ताव मारला. अर्थात जेवणासोबत आम्ही सर्वांच्या गप्पाही रंगल्या. चित्रपटांपासून, राजकारण, क्रिकेट आणि तत्त्वज्ञानापर्यंत अशा सर्व विषयांवर आम्ही भन्नाट बोलत सुटलो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'गर्जा महाराष्ट्र माझा'च्या कलाकारांमध्ये एक वेगळा बॉन्ड तयार झालाय. कलाकारांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी एक व्हॉट्स अॅप ग्रूपही तयार केलाय. ‘Patwardhan`s Kitchen’ असे या ग्रूपचे नाव.
व्यासपीठावर अप्सरा आली.. ती थिरकली आणि तिनं जिंकलं असंच काहीसं वर्णन करावं लागेल अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लंडनमधील खास डान्स परफॉर्मन्सचं. निमित्त होतं महेश पटवर्धन आयोजित 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाचं. सोनालीच्या या खास बहारदार आणि दिलखेचक परफॉर्मन्सनं या कार्यक्रमाला चारचाँद तर लावलेच शिवाय लंडनमधील तमाम मराठी रसिकांना आपल्या तालावर थिरकण्यास भाग पाडलं. पब्लिक डिमांडमुळं पुन्हा एकदा अप्सरा केल्याचं सोनालीनं सांगितलं. महेश पटवर्धन यांच्यासोबत आधी काम केलं असून हॅट्रिक परफॉर्मन्सचा आनंद तिच्या चेह-यावर पाहायला मिळाला.. गर्जा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमासाठी येणारे रसिक स्पेशल असतात, त्यामुळं त्यांच्यापुढे परफॉर्मन्स देणं हे तितकंच स्पेशल असतं असं तिला वाटतं. मनोरंजनासह सामाजिक बांधिलकी जपणा-या महेश पटवर्धन यांच्या या 'गर्जा महाराष्ट्र' कार्यक्रमाशी जोडलं जाणं हे खास असतं आणि त्यातून मिळणा-या लोकांच्या आशीवार्दातून नवी ऊर्जा मिळते असं सोनालीनं म्हटलंय.
'गर्जा महाराष्ट्र माझा'च्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने ‘लोकमत’शी खास गप्पा मारल्या. आपल्या बोलण्यात सोनाली डॉ. महेश पटवर्धन यांचा उल्लेख महेश दादा असा करताना दिसली. महेश यांच्या पत्नीला मी वहिनी म्हणते, असेही तिने सांगितले. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमात सोनाली तिसºयांदा सहभागी होतेय. पण तरिही तिचा उत्साह नवख्या कलाकाराला लाजवणारा होता.
लंडनमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दुमदुमला. 'पिंजरा'च्या बहारदार लावण्यांवर थिरकत अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं रसिकांनाही ठेका धरायला लावला. महेश पटवर्धन आयोजित 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमात प्रार्थनाच्या या लावणी परफॉर्मन्सनं या कार्यक्रमात रंगत आणली. एकाहून एक तीन सरस लावण्या सादर करुन प्रार्थनानं उपस्थितांची मनं जिंकली.. पहिल्यांदाच गर्जा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमात परफॉर्मन्स दिल्याचा आनंद प्रार्थना लपवू शकली नाही. कार्यक्रमाआधी थोडी नर्व्हस असणा-या प्रार्थनाला आॅस्ट्रेलियात दिलेल्या परफॉर्मन्सपेक्षाही हा कार्यक्रम खास वाटतो. एका सामाजिक कामासाठी आयोजित कार्यक्रमात परफॉर्मन्स दिल्याचा आनंद सर्वाधिक असल्याचं तिनं सांगितलं.