कल्पनेतील प्राण्यात सर्वात पहिले नाव मॉन्स्टर अर्थात आक्राळविक्राळ प्राण्याचे आहे. हे केवळ तळ्यातील मॉन्स्टर नसून स्कॉटिश हायलँड्सवरील तळ्यात उंच मान असलेला हा प्राणी आढळतो. सहाव्या शतकापासून हा मॉन्स्टर असल्याचे सांगण्यात येते. १९३० साली हा प्राणी दिसला होता, असेही म्हणतात, मात्र शास्त्रज्ञांनी हा सगळ्या भ्रामक गोष्टी असल्याचे सांगितले आहे.
हा विख्यात प्राणी जगभरातील सर्वच संस्कृतीत असल्याचे सांगण्यात येते, तथापि आशिया आणि युरोपियन देशात हा अधिक लोकप्रिय आहे. आशियाई देशातील ड्रॅगन म्हणजे मोठा सरडा अथवा साप आहे, जो तोंडातून मोठी आग ओकत असतो. युरोपमधील ड्रॅगनला पंख असतात. आशियामध्ये ड्रॅगनचा अर्थ धाडस आणि शहाणपण तर युरोपमधील ड्रॅगन गुलामगिरीचे प्रतिक आहे.
व्हॅम्पायर अर्थात पिशाच्च, राक्षशीण अथवा चेटकीण. हे अनेक संस्कृतीत आढळते. प्रत्येक वेळा वेगळे नाव आहे. हे अत्यंत कल्पनेतील लोकप्रिय पात्र आहे. प्रत्येक देशात फिरत असते आणि लोकांंना चावून त्यांचे रक्त शोषून घेणारे आहे. लोकांना पकडणारे आणि वेगवेगळे आकार घेणारे आहे.
हा एक अंगभर केस असणारा महाकाय मानव आहे. पॅसिफिक उत्तरपूर्व भागातील जंगलात हा प्राणी आढळत असल्याचे सांगण्यात येते. याची काही छायाचित्रे मिळाली आहेत, अथर्वात मॉन्स्टरप्रमाणे शास्त्रज्ञांनी हा प्राणी नाही असे सांगितले आहे. हा दिसून आलेला नसल्याने याविषयी काही सांगता येत नाही.
पौराणिक काळातील मानवाप्रमाणे ते कोल्ह्यात अथवा कोल्ह्याच्या रुपात आढळतात असे सांगितले जाते. तुम्हाला जर हा प्राणी चावला अथवा थोडे जरी खरचटले तरी तुम्ही मानवीकोल्हा बनता. इंग़्रजी कथांप्रमाणे पौर्णिमेच्या रात्री मानवकोल्हा बनतो. चांदीपासून बनविलेली शस्त्रे सोडून तो कशालाही घाबरत नाही.
हा एक प्रकारचा घोडा असला तरी त्याच्या डोक्याजवळ मोठे पंख आहेत. कल्पनेतील प्राण्यांमध्ये हा खूप लोकप्रिय आहे. शुद्धता आणि आकर्षणशीलता म्हणून याकडे पाहिले आहे. याविषयी असणाºया कल्पनेबाबत कोणतीही माहिती नाही.