काही मंत्राचा जप केल्याने जीभ, आवाज, ओठ, पडजीभ आणि शरीरातील इतर भागावर दाब पडतो. मंत्राच्या उच्चारणामुळे रोग प्रतिकारक शक्ती आणि आनंदी संप्रेरकाच्या कार्यरत राहण्याला प्रेरणा मिळते. तुम्ही जितके आनंदी रहाल तितकी रोगप्रतिकारक क्षमता अधिक वाढते.
मंत्राच्या विशिष्ट उच्चारामुळे संप्रेरके उत्तेजित होतात, त्यामुळे तुमचे मन शांत राहते आणि तुमचे शरीर आरामदायी राहते. मनावर ताबा मिळविणे आणि मन निश्चल राहण्यासाठी याचा उपयोग होतो.
शरीरचक्र उत्तेजित करण्यास जप उपयोगी पडतात. आपल्या शरीरातील केंद्रबिंदूला चक्र असेही म्हटले जाते. शरीराच्या विविध भागातील अवयांना सहजपणे काम करण्यासाठी हे उर्जाकेंद्र फायदेशीर ठरते. चक्राच्या फिरण्यात थोडीशी अस्ताव्यस्तता येते आणि जपामुळे ते योग्य मार्गावर चालते. यामुळे तुमचे शरीर रोगापासून दूर राहते.
संशोधनानुसार जे मंत्राचा जप करतात त्यांची शिकण्याची क्षमता आणि एकाग्रता अधिक असते. ज्यावेळी तुम्ही जप करीत असता, त्यावेळी उच्चारामुळे तुमच्या शरीरातील चक्रे उत्तेजित होतात आणि चेहºयावर दिसू लागतात. यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती अधिक वाढते.
मंत्राच्या जपामुळे व्यक्ती शांत होतो आणि त्याची श्वसनप्रक्रिया हळू होते, यामुळे हृदयाचे ठोके नियमित होण्यास मदत होते, तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
यामुळे तणावासंबंधी समस्या कमी होण्यास मदत होते. रोजच्या जपामुळे तुमच्या शरीरातील सततचा तणाव कमी होतो.
मंत्रामुळे तणाव कमी करण्यास मदत होते. मंत्राच्या जपामुळे संप्रेरके निर्माण होतात आणि तणावाला दूर ठेवण्यास उपयोगी पडते.
उच्चारामुळे तुमच्या चेहºयावरील रक्ताभिसरण वाढते. जपामुळे तुमच्या त्वचेला अधिक आॅक्सिजन मिळतो आणि तुम्ही अधिक तरुण दिसता.