जाड्या किंवा लठ्ठ माणसाला केक खा म्हणणे म्हणजेच शास्त्रज्ञच नव्हे तर सामान्य नागरिकाला हसू येईल. संशोधकांनी नुकत्याच केलेल्या चाचणीनुसार केक अथवा असेच पदार्थ जर सकाळी खाल्ले तर तुमचे वजन कमी होऊ शकते. सकाळी प्रत्येकालाच साखरेची गरज असते. शरीर अत्यंत कार्यरत असते. यावेळी पचनशक्ती अधिक होते. रात्री अधिक प्रमाणात खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात मेदाचे प्रमाण वाढू शकते.
तुम्ही जर न्यूजर्सीमध्ये राहत असला तरी इटालियन्स आपल्या पदार्थांविषयी किती उत्सुक असतात हे तुम्हाला ठावूक होते. त्याचवेळी तुम्ही इटलीमध्ये रहायला जा, इटालियन लोक खाण्यापेक्षा जिलॅटोकडे अधिक लक्ष देताना दिसून येतात. इटलीमधील शास्त्रज्ञ आपल्या राष्टÑीय खाद्यपदार्थांवर संशोधन करत आहेत. भोजनाऐवजी तुम्हाला आईसक्रीम खाताना दिसतील. जिलॅटोमध्ये पोषणयुक्त मूल्ये, प्रथिने, साखर, मेद आणि कॅलरीजचा समावेश असतो.
तुमच्या हृदयासाठी चॉकलेट खाणे कधीही चांगले. रक्तदाब आणि हृदयाचे कार्य चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी योग्य प्रमाणात चॉकलेट्सचा वापर करा. सामान्य आजारावरील औषधांच्या कंपन्या कदाचित वापरतही नसतील परंतु त्वचारोगाविषयीच्या औषध कंपन्या आपल्या औषधात चॉकलेट्सचा वापर करतात. कारण ते त्वचेसाठी योग्य असते.
नैसर्गिक साखर तुमच्या दातासाठी चांगली असते. आपल्या जुन्या नेहमीच्या वापरातील साखरेविषयी काय? शास्त्रज्ञांच्या अनुसार नैसर्गिक उत्तम असते. च्युर्इंगम, मिंट आणि इतर कँडीमध्ये अशा साखरेचा वापर आवश्यक आहे.
काळी मिरे म्हणजे जंक फुड्स नव्हे. आहारात वापरण्याचा हा एक पदार्थ आहे. काही मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते. काळी मिरे हे औषधासाठी वापरले जाते. त्वचेसाठीही याचा वापर केला जातो.
पॉपकॉर्नमुळे कॅन्सरला दूर ठेवणे शक्य होते. तुमच्या आयुष्य वाढविण्यासाठी पॉपकॉर्न नक्कीच चांगले आहे. पॉपकॉर्नमध्ये अँटीआॅक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात, त्याला पॉलीफिनॉल्स असे म्हणतात. पॉलिफिनॉल्स कॅन्सरचा धोका कमी करतात.