राणी मुखर्जीने आदित्या चोपडा याला आपले पार्टनर निवडले. राणीचे हे पहिले लग्न होते व आदित्यचे दुसरे.
हॉट अॅण्ड सेक्सी अभिनेत्री करिना कपूर हिने सैफ अली खान याच्याशी लग्न केले. सैफचे आधी अभिनेत्री अमृतासिंग हिच्याशी लग्न झाले होते. मात्र कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला आणि नंतर सैफने करिनाशी दुसरा विवाह केला.
विद्या बालन हिनेही सिद्धार्थ रॉय कपूर याच्याशी लग्न केले. सिद्धार्थचे हे तिसरे लग्न. यापूर्वीच्या दोन पत्नींना घटस्फोट दिल्यानंतर त्याने विद्याशी संसार थाटला.
शिल्पा शेट्टी हिनेही राज कुंद्रा याच्या रूपातएका घटस्फोटित उद्योगपतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
श्रीदेवीने बोनी कपूरशी लग्न केले. बोनी कपूरही घटस्फोटित. अर्जून कपूरची आई मोना हिला बोनीने घटस्फोट दिला आणि श्रीदेवीशी संसार थाटला.
अभिनेत्री लारा दत्ता हिने महेश भूपती याच्याशी लग्नगाठ बांधली. महेशचे श्वेता जयशंकर हिच्याशी विभक्त झाला आणि लाराशी त्याने दुसरे लग्न केले.
कल्कीने अनुराग बसूशी लग्न केले. आरती बजाज ही अनुरागची पहिली पत्नी. तिला घटस्फोट दिल्यानंतर अनुरागने कल्कीशी दुसरा संसाद थाटला.
शबाना आझमी हिनेही पहिल्या पत्नीला घटस्फोट देणारे जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले.
सारिकानेही पहिली पत्नी वाणी गणपथी हिच्यासोबत फारकत घेतलेले कमल हसन यांना पती म्हणून निवडले.