पेंटॅगॉनचे शास्त्रज्ञ लेलँड डब्ल्यू स्प्रिंकल यांनी १९५६ साली जगातील सर्वात मोठ्या संगीत वाद्याची अर्थात स्टॅल्कपाईप आॅर्गनची निर्मिती केली. व्हर्जिनियातील साडेतीन एकरावर पसरलेल्या लुरे गुफांमध्ये हे वाद्य तयार करण्यात आले. यामध्ये विविध रबराच्या लाकडी हातोड्यांचा वापर करण्यात आला आहे. या गुहेत कोणत्याही लाऊडस्पीकरविना या वाद्याचा आवाज ऐकता येतो. २०११ साली स्कँडीव्हियन ग्रुप पेपे डिलक्स या कलाकाराने यावर पहिल्यांदा गाणे वाजविले.
सौर उर्जेवर चालणारे हे जगातील एकमेव संगीत वाद्य आहे. या शार्पसिकॉर्डमध्ये एक सिलींडर असून त्याला ११,५२० छिद्रे आहेत. त्यात प्लग पिन घालून संगीत तयार होते. कोणीही या ठिकाणी येऊन संगीत तयार करु शकते. तथापि हे वाद्य केवळ ९० सेकंद वाजविता येते. त्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते.
याचे मुळ नाव अॅथिरफोन आहे. थेरेमिन हे वेगळे संगीत वाद्य आहे. यामध्ये बरीचशी इलेक्ट्रॉनिक वाद्ये आहेत. रशियन निर्माता लिआॅन थेरेमिन याने १९२० साली याची निर्मिती केली आणि त्याला आपले नाव दिले. याला दोन धातूचे अँटेना आहेत. जे वाजविणाºयाच्या हातात असतात आणि दोन दोलकांना ते जोडलेले असतात. वाजविणारा आपले हात या अँटेनाच्या रेंजनुसार चालवितो. हे इलेक्ट्रॉनिक संगीत वाद्य आहे.
हे अगदी विचित्र असे वाद्य आहे. त्याला सिंगींग रिंगीग ट्री असे नाव देण्यात आले आहे. इंग्लंडमधील पेनी हिल्स येथे स्थापन करण्यात आले आहे. माईक टोन्किन आणि अॅना लियु यांनी याची निर्मिती करुन २००६ साली बसविले. याची उंची ३ मीटर इतकी असून, विविध आकाराच्या स्टील पाईपचा यात वापर करण्यात आला आहे. या वाद्यातून अनेक गुणवत्तेचे आवाज तयार होतात.
याचा नावावरुनच सर्व काही कळते. हे एक आॅर्गन आहे. जे पाणी किंवा इतर द्रव पदार्थाने वाजविता येते. स्टीन मॅन यांनी याची निर्मिती केली आहे. यालाही अनेक छिद्रे आहेत. जेव्हा याच्यावरुन पाणी पडते, त्यावेळी एक छिद्र बंद होते आणि याच्या रचनेतून अनेक आवाज निघतात. हे मंद दृष्टीच्या व्यक्तीलाही वाजविता येते. कॅनडामधील ओन्टॅरिओ सायन्स सेंटरमध्ये हे ठेवण्यात आले आहे.