अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्यााच्या उंच डोंगरावर हा किल्या आहे.अकोल्या पासुन याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे.
मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्याावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरुज बांधून संरक्षणाची सिद्धता केलेली आहे.
किल्ल्याच्या नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की, किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच सोपाआहे. पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामागेर्चालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड ,विसापूर ,पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.
पुण्यापासून अवघ्या ९० कि.मी. पश्चिमेस असणारा हा एकाकी लहानखुरा किल्ला .त्याला विशेष प्रकाशात आणले ते कै.दत्तोबा पासलकर यांनी .सह्याद्रीच्या कुशीत पुणे व रायगड जिल्ह्यांच्या सरहद्दीवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ह्याचा समावेश होतो, माणगावपासून २० कि.मी. वरील ह्या किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीवर आहे समुद्रसपाटीपासून जरी उंची कमी असली तरी खाडी चढण किवा लांबच लांब उजाड मागार्ने हा किल्ला जवळ करावा लागतो .
इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे पूर्वेकडे असणा-या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात.यात कळसूबाई ,अलंग,कुलंग ,अवंढ - पट्टा हे किल्ले येतात तर पश्चिमेकडे असणा-या रांगेत त्रिंगलवाडी,कावनई ,हरीहर,ब्रम्हगिरी,अंजनेरी हे किल्ले येतात.