डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:33 IST
1 / 10राज्यात सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी झाले आहे. त्यात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज नेते, अभिनेत्री, अभिनेत्री आणि विविध मान्यवर दरबारात पोहचत असतात. 2 / 10नुकतेच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिरंजीव पार्थ पवार हे पोहचले होते. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पार्थ पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. यावेळी त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. 3 / 10मात्र पार्थ पवार यांच्यासोबत असलेल्या एका बॉलिवूड अभिनेत्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले. लालबागच्या राजाच्या दर्शनाला ही बॉलिवूड अभिनेत्री पार्थ पवार यांच्यासोबत मंडपात दाखल झाली. हिरव्या रंगाचा ड्रेस घातलेल्या अभिनेत्रीने डोक्यावर पदर घेतला होता तर हातात दुर्वा होती. 4 / 10पार्थ पवार दर्शन घेत असताना त्यांच्या मागेच उभी असलेली ही अभिनेत्री होती जॅकलिन फर्नांडिस..जॅकलिन आणि पार्थ यांनी एकत्रित लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर या दोघांचे व्हिडिओ बरेच व्हायरल होत आहेत. 5 / 10या व्हिडिओत पार्थ पवार दानपेटीत टाकण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस हिच्या हातात पैसे देताना दिसतात. तिथल्या माध्यमांच्या कॅमेऱ्याने हे दृश्य टिपले. हा व्हिडिओ इन्स्टावर व्हायरल होत आहे. 6 / 10त्याशिवाय हे दोघेही एकत्रित लालबागच्या राजाची आरती सुरू असताना तिथेच हजर होते. यावेळीही माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी हे चित्र कैद केले. पार्थ पवार आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघांना एकत्र पाहून विविध चर्चांना उधाण आले.7 / 10दरम्यान, श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसने पहिल्यांदाच तिच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.8 / 10गणेशोत्सवातील मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.9 / 10नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत 10 / 10यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आला आहे.यासाठी खास सुवर्ण गजानन महाल साकारण्यात आला आहे.