'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:39 IST
1 / 8आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे केवळ पडद्यावरचे 'ही-मॅन' नव्हते, तर ते एका यशस्वी उद्योगपती देखील होते. 2 / 8८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असले तरी, त्यांनी बॉलीवूडसोबतच व्यावसायिक क्षेत्रातही एक मोठे साम्राज्य उभे केले होते.3 / 8मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती सुमारे ४५० कोटी रुपये होती. त्यांनी आपली कमाई केवळ चित्रपटांपुरती मर्यादित न ठेवता, ती हॉटेल व्यवसाय, रिअल इस्टेट, शेती आणि चित्रपट निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवली होती.4 / 8त्यांनी २०१५ मध्ये दिल्ली येथे आपल्या फिल्मी व्यक्तिरेखांवर आधारित 'गरम धरम ढाबा' उघडून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पाऊल ठेवले. 5 / 8या रेस्टॉरंटच्या यशानंतर, २०२२ मध्ये त्यांनी करनाल महामार्गावर त्यांच्या लोकप्रिय टोपणनावावरून 'ही-मॅन' नावाचे दुसरे रेस्टॉरंट सुरू केले.6 / 8त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा रिअल इस्टेटमध्ये गुंतलेला आहे. १०० एकरचा त्यांचा लोणावळा येथील आलिशान फार्महाऊस कोट्यवधी रुपयांचा आहे. याशिवाय, महाराष्ट्रात १७ कोटींहून अधिक किमतीची त्यांची अनेक घरे आणि शेतजमीन होती. 7 / 8महत्त्वाचे म्हणजे, ते याच फार्महाऊसजवळ ३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बनवण्याची योजना आखत होते.8 / 8त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील चालवले, ज्यातून 'यमला पगला दीवाना' सारख्या चित्रपटांची निर्मिती झाली.