Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कपूर, मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 10:54 IST

सिद्धांतने स्वत: इन्स्टास्टोरीवर याची माहिती दिली आहे.

ठळक मुद्देसिद्धांतला ‘गली बॉय’ या सिनेमामुळे खरी लोकप्रियता मिळाली. यात तो रणवीर सिंग व आलिया भटसोबत दिसला होता.

रणबीर कपूर कोरोनाशी लढतोय. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता मनोज वाजपेयी याचा रिपोर्टही कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. आता अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यालाही कोरोनाने ग्रासले आहे.सिद्धांतने स्वत: इन्स्टास्टोरीवर याची माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. प्रकृती ठीक आहे. घरीच क्वारंटाईन आहे. तब्येतीची काळजी घेतोय आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करतोय,’ असे सिद्धांतने म्हटले आहे.

सिद्धांत चतुर्वेदी सध्या ‘फोन भूत’ या सिनेमात बिझी होती. 'फोनभूत'चे दिग्दर्शन गुरमीत सिंग करत आहेत. तर निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची आहे. सुपरनॅचरल पॉवर्सची ही कहाणी रवी शंकरन यांनी लिहिली आहे.  2021 मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपटाची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. इशान खट्टर आणि कतरिना कैफ यांच्यासोबत तो या सिनेमाचे शूटींग करत होता. लवकरच सिद्धांत दीपिका पादुकोण व अनन्या पांडेसोबत शकुन बत्राच्या एका सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्यात या सिनेमाचे शूटींग झाले होते.

सिद्धांतला ‘गली बॉय’ या सिनेमामुळे खरी लोकप्रियता मिळाली. यात तो रणवीर सिंग व आलिया भटसोबत दिसला होता. या सिनेमात त्याने रणवीरचा रॅप गुरू एमसी शेरची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते.

टॅग्स :सिद्धांत चतुर्वेदी