Join us

पीसी करणार भोजपुरीतून डेब्यू

By admin | Updated: June 10, 2016 02:34 IST

प्रियांका चोप्रा लॉस एंजेलिस येथे तिच्या हॉलीवूडच्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी गेली आहे

प्रियांका चोप्रा लॉस एंजेलिस येथे तिच्या हॉलीवूडच्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी गेली आहे. ती काही दिवसांसाठीच तिथे राहणार आहे. एवढ्या बिझी शेड्युलमध्येही तिने ३० ब्रँड, मॅगझीन शूटिंग, मीटिंग्ज पूर्ण केल्या आहेत. यूएसएला परत जाण्यापूर्वी तिने तिच्या आजीच्या अंत्यविधीला कोचीनमध्ये हजेरी लावली. ती आता तिच्या एका भोजपुरी इंडस्ट्रीतून डेब्यू केला. ‘बम बम बोल रहा हैं काशी’ हा संतोष मिश्रा दिग्दर्शित चित्रपट असून, आम्रपाली दुबे आणि दिनेश लाल यादव हे कलाकार तिच्यासोबत असणार आहेत. ती पटणा येथे चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावण्यासाठी गेली होती, तसेच ती मराठी आणि पंजाबी चित्रपट तिच्या होम प्रोडक्शनअंतर्गत साकारणार आहे.