Join us

एकता कपूरने मान्य केल्या पार्थ समथानच्या सर्व अटी, फीसमध्येही केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 13:26 IST

पार्थ समथान 'कसौटी जिंदगी के' ही मालिका सोडून जातोय अशी बातमी गेल्या काही काळापासून येत होती.

गेल्या काही काळापासून अशी बातमी आली आहे की पार्थ समथान  'कसौटी जिंदगी के' ही मालिका सोडून जातोय आणि मेकर्स त्याला थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत.अलीकडे एक बातमीही आली होती की, पार्थ समथनने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे नोव्हेंबर 2020 ला ही मालिका बंद होणार अशी चर्चा होती. 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एकता कपूरने पार्थच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि तो या मालिकेचा भाग असणार आहे.  गेल्या काही दिवसांपासून एकता कपूर गणेशोत्सवात बिझी होती त्यामुळे तिला पार्थशी बोलता डिटेलमध्ये बोलता आलो नव्हते. 

पार्थने ठेवल्या होत्या मागण्यारिपोर्टनुसार, मेकर्सनी पार्थची डिमांड मान्य केली. त्याने आपली फी वाढवण्याची मागणी केली होती आणि सांगितले होते की मालिकेची कथा त्याच्यावर केंद्रित व्हायला हवी. निर्मात्यांनी हे मान्य केले आहे आणि आता शोची कथा अनुराग (पार्थ समथान), प्रेरणा (एरिका फर्नांडिस) आणि तिची मुलगी यांच्या अवतीभवती फिरेल. आमना शरीफ आणि करण पटेल या मालिकेचा भाग असाणार आहेत. 

 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2एकता कपूर