Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीती चोप्राच्या मोबाईलमध्ये राहतो अर्जुन कपूरचा फोटो, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 11:12 IST

अर्जुन कपूर मलायका अरोराच्या प्रेमात आहे आणि तिकडे परिणीती चोप्राच्या मोबाईलमध्ये अर्जुनचा फोटो आहे. पण थांबा...तुम्ही विचार करताय तसले मात्र काहीही नाहीये.

ठळक मुद्देपरिणीती आणि अर्जुन कपूर या दोघांनीही ‘इशकजादे’ या चित्रपटातून आपला डेब्यू केला होता.

अर्जुन कपूर मलायका अरोराच्या प्रेमात आहे आणि तिकडे परिणीती चोप्राच्या मोबाईलमध्ये अर्जुनचा फोटो आहे. पण थांबा...तुम्ही विचार करताय तसले मात्र काहीही नाहीये. परिणीतीच्या मोबाईल फोनची गॅलरी अर्जुन कपूरच्या फोटोंनी भरलेली आहे, हे जरी खरे असले तरी अर्जुन केवळ परिणीतीचा मित्र आहे. तोही ‘सच्चा’ मित्र. होय, खुद्द परिणीतीने याचा खुलासा केला.

‘फीट अप विद द स्टार्स सीजन 2’च्या ताज्या एपिसोडमध्ये परीने हजेरी लावली. यावेळी अर्जुनसोबत असलेल्या नात्यावर ती बोलली. आमच्यात ‘मैत्री आणि वैर’ असे नाते आहे. बॉलिवूडमध्ये एक खरा मित्र शोधणे अतिशय कठीण आहे. पण अर्जुनच्या रूपात मला एक मित्र मिळालाय. तो माझा अगदी खरा मित्र आहे. माझा मोबाईल फोन त्याच्याकडे सोपवताना मी अगदी बिनधास्त असते. बिनदिक्कत मी त्याला माझा फोन देत. जेव्हा केव्हा मी गॅलरी बघते, त्यात ५० पेक्षा अधिक सेल्फी असतात आणि सगळ्या अर्जुनच्या असतात, असे परी म्हणाली.

अर्जुन लवकरच मलायकासोबत लग्न करणार, अशी चर्चा आहे. याबद्दलही परीला छेडले गेले. पण अर्जुन लग्न करतोय की नाही, हे मला ठाऊक नाही, असे सांगून तिने हा प्रश्न चतुराईने टाळला.परिणीती आणि अर्जुन कपूर या दोघांनीही ‘इशकजादे’ या चित्रपटातून आपला डेब्यू केला होता. यानंतर ‘नमस्ते इंग्लंड’मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. लवकरच हे दोघे ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटातही एकत्र दिसणार आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट फार पूर्वी प्रदर्शित होणार होता. पण सध्या त्याची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. परिणीतीच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या ती साईना नेहवालचे बायोपिक करतेय. याशिवाय ‘जबरिया जोडी’ आणि ‘द गर्ल आॅन द ट्रेन’ या अमेरिकन चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही ती झळकणार आहे.

टॅग्स :परिणीती चोप्राअर्जुन कपूर