Join us  

'परदेस' फेम महिमा चौधरीची लेक सौंदर्यात देते बॉलिवूडच्या स्टारकिड्सना टक्कर, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 5:52 PM

Mahima Chaudhary: महिमा चौधरी यांची मुलगी अर्याना चौधरी खूप गोंडस आणि सुंदर आहे. अर्यानासोबतचे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

'परदेस' चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीचा निरागस चेहरा आणि गोंडस हास्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. महिमा चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. महिमा सध्या अनेक व्हिडिओ पोस्ट करत आहे, ज्यामध्ये ती तिची मुलगी अर्याना चौधरीसोबत मस्ती करताना दिसत आहे.

महिमा चौधरीने तिची मुलगी अर्याना चौधरीसोबत मस्ती करतानाचे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कधीकधी तिच्यासोबत फोटोशूट करताना दिसत आहे. कधीकधी ती इन्स्टा फिल्टरवर एक्सप्रेशन देताना दिसते. अर्याना खूप सुंदर आणि गोड आहे. ती केवळ १५ वर्षांची आहे आणि तिचे फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत.

महिमा चौधरी आणि अर्याना चौधरीच्या व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका मीडिया यूजरने लिहिले, तू तुझ्या आईसारखी दिसते. आणखी एका यूजरने लिहिले की, आई आणि मुलगी दोघीही सुंदर आहेत. आणखी एका यूजरने लिहिले, सुंदर आईची सुंदर मुलगी. दुसऱ्या युजरने लिहिले की, तुमची मुलगी खूप क्यूट आहे. 

महिमा चौधरीने १९९७ साली शाहरुख खानसोबत परदेस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. तसेच त्यातील गाणीही खूप गाजली. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात अमरीश पुरी आणि आलोक नाथ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्याचबरोबर महिमाने 'दाग: द फायर', 'धडकन', 'कुरुक्षेत्र', 'बागबान' सारख्या चित्रपटात काम केले. शेवटची ती बंगाली क्राइम थ्रिलर 'डार्क चॉकलेट'मध्ये झळकली होती.
टॅग्स :महिमा चौधरी