'पंचायत ४' वेबसीरिज काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाली. 'पंचायत'चा हा नवा सीझन पाहून बऱ्या-वाईट प्रतिक्रिया समोर येत आहेत. मागील तीन सीझनच्या तुलनेत 'पंचायत'चा नवा सीझन प्रेक्षकांना तितका आवडलेला दिसत नाहीये. यावेळी 'पंचायत ४' खऱ्या अर्थाने गाजवली ती बनराकस गँगने. म्हणजेच भूषण, बिनोद, माधव या तिघांनी 'पंचायत ४'मध्ये जबरदस्त अभिनय करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. अशातच 'पंचायत ४'च्या प्रिमिअरला भूषण अर्थात अभिनेता दुर्गेश कुमारला क्लीन शेव्ह लूकमध्ये पाहून सर्वजण थक्क झाले.
भूषणचा क्लीन शेव्ह लूक
'पंचायत ४'मधील भूषण अर्थात अभिनेता दुर्गेश कुमारने वेबसीरिजच्या प्रिमिअरला हजेरी लावली. यावेळेस सर्व कलाकारांनी त्यांच्या स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केलं. पण खऱ्या अर्थाने चर्चा झाली ती, 'पंचायत ४'मधल्या भूषणची. अभिनेता दुर्गेश कुमारने क्लीन शेव्ह लूक करुन या प्रिमिअरला हजेरी लावली. दुर्गेशला पाहून हा खरंच बनराकस आहे का? अशा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला. देख रहा है बिनोद, हा सीरिजमधला गाजलेला संवाद दुर्गेशने सर्वांसमोर म्हटला. एकूणच अशा लूकमध्ये दुर्गेशला सर्वजण पाहतच राहिले.
दुर्गेशने 'पंचायत ४' गाजवली
'पंचायत ४' सीरिज यावेळी खऱ्या अर्थाने दुर्गेश कुमारने गाजवली. दुर्गेशने या सीरिजमध्ये भन्नाट अभिनय करुन सर्व प्रमुख कलाकारांच्या वरचढ काम केलंय. दुर्गेशला साथ मिळालीय बिनोद आणि माधव साकारणाऱ्या कलाकारांची. दुर्गेशबद्दल सांगायचं तर, अनेक सिनेमांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करुन दुर्गेशला 'पंचायत' वेबसीरिजनिमित्ताने प्रसिद्धी मिळाली. 'पंचायत' सीरिजच्या प्रत्येक सीझनमध्ये दुर्गेशने साकारलेली बनराकस भूषणची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.