Join us

पाकिस्तानी अभिनेत्री पडली आर्यन खानच्या प्रेमात, श्रीदेवीशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 15:25 IST

Aryan Khan: पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. सजल हिने श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट असलेल्या मॉममध्ये तिच्या आईची भूमिका केली होती.

मुंबई - पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. सजल हिने श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट असलेल्या मॉममध्ये तिच्या आईची भूमिका केली होती. तेव्हापासून हिंदी चित्रपटसृष्टीत तिचं वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे. दरम्यान, सजल हिने हल्लीच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याबाबत प्रेम व्यक्त करत आपल्या मनातील गुपित उघड केलं होतं. 

सजल अली तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या प्रेमावरून चर्चेत आली आहे. हल्लीच तिने इन्स्टावर आर्यन खानचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आर्यन खान मात्र कधीही सोशल मीडियावर फार अपडेट राहत नाही. मात्र त्याच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. 

सजल हिने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये पांढऱ्या टी-शर्टामध्ये आर्यन खानचा एक जुना फोटो शेअर केला. त्यामध्ये तो मोकळेपणाने पोझ देताना दिसत आहे. तसेच त्याच्याप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी शाहरुख खानच्या चित्रपटातील एक गीत लाल लव्ह साईनच्या इमोजीसह शेअर केलं आहे.  सजल अली हिने २०१७ मध्ये रवी उदयवरच्या मॉम चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने या चित्रपटात श्रीदेवीची मुलगी आर्या हिची भूमिका बजावली होती. २०२० मध्ये सजलने बॉयफ्रेंड अहद रजा मीर याच्याशी अबू धाबीमध्ये विवाह केला होता. 

टॅग्स :आर्यन खानबॉलिवूड