पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-रॅपर बादशाह हे एकमेंकाना डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. दोघांनीही डेटिंगच्या बातम्याना अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण, ते अनेकदा एकत्र दिसतात. यातच आता पुन्हा एकदा दोघे कॅनडामध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत.
हानिया आमिर हिने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती बादशाहला मिठी मारताना दिसून येत आहेत. दोघांची जवळीक पाहता चाहतेही उत्सूक झाले आहेत. हानियाने रॅपरला तिचा बेस्ट फ्रेंड म्हटले आहे. 'हिरो' आणि 'रॉकस्टार' असं म्हणत त्याचं कौतुकही केलं.
याआधीही हानिया आणि बादशाह हे दोघे दुबईमध्ये एकत्र एन्जॉय करताना दिसून आले होते. हानिया हिनं पाकिस्तानी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं. तिच्या सौंदर्यामुळे तिचे अनेक देशात फॅन्स आहेत. हानिया याआधी पाकिस्तानी गायक असीम अजहरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र नंतर दोघांचं ब्रेकअप झालं. ध्या ती पाकिस्तानातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.