Join us  

अक्षय कुमारच्या OMG 2 वर संकट, २० दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप, रिलीज डेट पुढे ढकलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 1:34 PM

अक्षय कुमार आणि फिल्मच्या मेकर्सचे टेन्शन वाढले आहे.

अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या आगामी सिनेमा 'ओह माय गॉड 2' (OMG 2) मुळे चर्चेत आहे. 'ओह माय गॉड' च्या पहिल्या भागाला मिळालेल्या तुफान यशानंतर दुसऱ्या भागाकडूनही अपेक्षा आहेत. यामध्ये परेश रावल नसून पंकज त्रिपाठी दिसणार आहेत. धार्मिक विषयावर सिनेमा आधारित असल्याने सेन्सॉर बोर्ड फारच सतर्क झालं आहे. बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या उपस्थितीत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या रिवायजिंग टीमने सिनेमा पाहिला. यानंतर चित्रपटातील  तब्बल २० दृश्यांवर कात्री मारण्याचा आणि फिल्मला A सर्टिफिकेट देण्याची सूचना मेकर्सला करण्यात आली आहे.

फिल्मला ए सर्टिफिकेट देण्याचा अर्थ असा की १८ वर्षांपेक्षा कमी वयातील मुलं सिनेमागृहात जाऊन फिल्म बघू शकणार नाहीत. त्यामुळे अक्षय कुमार आणि फिल्मच्या मेकर्सचे टेन्शन वाढले आहे. अद्याप मेकर्सला 'शो कॉज' नोटीस मिळालेली नाही.सीबीएफसीने सिनेमा बघितल्यानंतर जे गाणं रिलीज झालं त्यातून सिनेमाची रिलीज डेटच गायब होती. रिलीजला आता खूप कमी दिवस राहिलेत. त्यामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येईल अशीही शक्यता आहे. पण जर सिनेमाला वेळीच सर्टिफिकेट मिळाले तर अक्षय आणि सनी देओल बॉक्सऑफिसवर भिडताना दिसतील. ११ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होतो. तर सनी देओलचा 'गदर 2' देखील त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

अमित राय यांनी दिग्दर्शित केलेल्या 'ओह माय गॉड 2' सिनेमात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका आहे. २०१२ साली आलेल्या 'ओह माय गॉड' सिनेमाचा हा सिक्वल आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारपंकज त्रिपाठीप्रसून जोशीबॉलिवूडसिनेमा