Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठीक आहे, पण मला कोसळतंय रडू', आमिर खानची लेक इराने व्हिडीओत व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:42 IST

आमिर खानची लेक इरा खान मानसिकदृष्ट्या मोठ्या संकटाला सामोरी जात आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान चुलतभाऊ झेन मारीच्या लग्नातील फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. फोटोत हसणारी इरा मानसिकदृष्ट्या मोठ्या संकटाला सामोरी जात आहे. लग्नाच्या काळात डिप्रेशनशी कसा सामना केला, हे इराने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे.  गेल्या काही काळापासून आपल्याला बरं वाटत नाहीये. 

मला बरेचदा रडू कोसळतं. कामावर जा, रडा आणि झोपा हे करण्यातच बरेच दिवस गेले, असे इराने सांगितले.आपल्या भावाच्या लग्नातील किस्से इराने सांगितले आहेत. मी माझ्या खऱ्या भावना लपवून ठेवल्या. मी नव्या जोडप्यासाठी खुश होते, पण फोटोसाठी मला चेहऱ्यावर उसने हसू आणावे लागत होते. दिवसभर बेडमध्ये बसण्याऐवजी लग्नाच्या विधींमध्ये सहभागी व्हावे लागत होते, असेही इराने या व्हिडीओमध्ये सांगितले.

“चेतावनी : हा आनंदी, सकारात्मक व्हिडीओ नाही. पण हा दुःखद, नकारात्मकही नाही, मात्र मी आहे (नकारात्मक) आणि तुम्हीही लो फील करत असाल, तर कदाचित हा व्हिडीओ तुम्ही पाहायला नको. तुम्हीच ठरवा. मी अक्षरशः पुटपुटत आहे. पुढच्या वेळी याबद्दल अधिक काळजी घेईन” असं कॅप्शन इराने व्हिडीओला दिले आहे.

इरा खानने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वांसमोर येऊन मानसिक आरोग्यावर भाष्य केले होते. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने तिने क्लिनिकल डिप्रेशनशी सामना करतानाचा आपला अनुभव सांगितला होता.

हाय, मी डिप्रेस्ड आहे. आता याला चार वर्ष झाली असतील. मी डॉक्टरांकडे गेले आहे. क्लिनिकल डिप्रेशन आहे. सध्या मी बरी आहे. गेल्या वर्षभरापासून मला मानसिक स्वास्थ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. मी तुम्हाला माझा प्रवास सांगते, असं इराने ऑक्टोबरमध्ये व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं.

टॅग्स :आमिर खानइरा खान