Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्री नाकारला संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा, मग झाली आलियाची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 11:26 IST

गंगुबाईसाठी आलिया भट नव्हती त्यांची पहिली पसंती.

दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साळी हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.  आतापर्यंत संजय लीला भन्साळी यांच्या  अनेक सिनेमात दीपिका पादुकोणने काम केले आहे. बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला राम-लीला आणि पद्मावत यासारखे हीट सिनेमा या जोडीने बॉलिवूडला दिले आहे.

ऐवढेच काय तर संजय लीला बन्साळी याची पहिली पसंती नेहमीच दीपिका पादुकोणला असते. संजय लीला भन्साळी यांचा चर्चेत असलेल्या आगामी सिनेमा गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट आधी ही ऑफर दीपिका पादुकोणला देण्यात आली होती. मात्र दीपिकाने ही ऑफर नाकारली. 

बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार दीपिकाने आधीच विशाल भारव्दाज यांचा सपना दीदी साईन केला होता. डिप्पीला लागोपाठ दोन गँगस्टार ड्रामा सिनेमांमध्ये काम करायचे नव्हते. या दोन कराणांमुळे तिने या सिनेमात काम करण्यास नकार दिला. हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे.

सपना दीदीबाबत बोलायचे झाले तर रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती.रहीमाने आपल्या नवऱ्याच्या खूनचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॅन आखला होता. मात्र यात तिचाच मृत्यू झाला. सिनेमात रहिमाची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे.   

टॅग्स :दीपिका पादुकोणआलिया भटसंजय लीला भन्साळी