Join us  

सोशल मीडियावर नोरा फतेहीच्या ‘Kusu Kusu’ची चर्चा, तुम्ही पाहिलं?  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 2:18 PM

Nora Fatehi : सध्या नोराचे ‘कुसू कुसू’ (Kusu Kusu Song ) हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

नोरा फतेही (Nora Fatehi) म्हटलं की रसिकांच्या काळजाची धडकन. नोराच्या मादक अदा, बोल्ड अंदाज आणि दिलखेचक नृत्य यामुळं रसिक सारं काही विसरुन जातात. त्यामुळेच नोराच्या प्रत्येक आयडट डान्सचीही तितकीच उत्सुकता तिच्या चाहत्यांना असते. नोरा फतेही मोरक्कन वंशाची अभिनेत्री आहे. 2014 मध्ये दिग्दर्शक कमल सदाना यांच्या ‘रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरवन’ या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सौंदर्याची मल्लिका आणि लाखो हृदयाची धडकन बनलेली नोरा आता निर्मात्यांची  पहिली पसंती बनली आहे. सध्या नोराचे ‘कुसू कुसू’ (Kusu Kusu Song ) हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.काही तासांपूर्वी नोराचं हे गाणं रिलीज झालं आणि काही तासांतच या गाण्याची चर्चा सुरू झाली.  आतापर्यत 4 मिलियनपेक्षाही अधिक जणांनी या गाण्याचा व्हिडिओ पाहिला आहे. यापूर्वी नोराच्या ‘दिलबर’, ‘ओ साकी साकी’ आणि ‘रॉक द पार्टी’ या गाण्यांनी धूम केली होती.

‘सत्यमेव जयते 2’  (Satyameva Jayate 2) या चित्रपटात नोरा ‘कुसू कुसू’ गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.  यात नोराच्या हटके मुव्ह पाहण्यासारख्या आहेत. जारा खान व देव नेगी यांनी गायलेलं हे गाणं तनिष्क बागचीने संगीतबद्ध केलं आहे. ‘सत्यमेव जयते 2’ ची कथा अन्याय आणि सत्तेच्या गैरवापराभोवती विणलेली आहे. जॉन अब्राहम व्यतिरिक्त, दिव्या खोसला कुमार, राजीव पिल्लई, साहिल वैधी आणि अनूप सोनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच त्याची कथाही मिलाप झवेरीने लिहिली आहे. टी-सीरीज आणि एमी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.येत्या 26 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय.

टॅग्स :नोरा फतेहीसत्यमेव जयते चित्रपट