Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला जाण्याची निमृतची इच्छा

By admin | Updated: August 18, 2014 22:52 IST

बॉलीवूडची नवोदित अभिनेत्री निमृत कौर होमलँड या अमेरिकन टीव्ही सिरीयलमध्ये एका पाकिस्तानी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलीवूडची नवोदित अभिनेत्री निमृत कौर होमलँड या अमेरिकन टीव्ही सिरीयलमध्ये एका पाकिस्तानी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. 2क्13 मध्ये द लंच बॉक्स या चित्रपटातून निमृतने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ती होमलँडच्या चौथ्या सिजनमध्ये एका पाकिस्तानी महिलेच्या भूमिकेत दिसेल. या टीव्ही सिरीयलमध्ये इस्लामाबादचे चित्रण आहे. निमृतच्या मते ही भूमिका निभावणो मजेदार ठरेल. निमृत म्हणाली, एवढय़ा लवकर अनुभवाबाबत काही सांगणो चुकीचे ठरेल. मी जराही वेळ न दवडता हा प्रस्ताव स्वीकारला होता. माझी भूमिका इंटरेस्टिंग आहे. भारत आणि पाकची संस्कृतीत काही प्रमाणात समान आहे. मी पंजाबची आहे आणि आपल्यात बरेच साम्य आहे. मला एकदा तरी पाकिस्तानला जाण्याची इच्छा आहे. माङो पूर्वज रावळपिंडीचे होते.