Join us

सोहेल-हुमाचे नो कनेक्शन! - सीमा खान

By admin | Updated: January 5, 2016 03:48 IST

हुमा कुरेशी आणि सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान यांच्यात डेटिंग सुरू असल्याची अफवा बॉलीवूडमध्ये आहे. सोहेल हुमाला महागडे गिफ्ट्स देत असल्याची चर्चा सुरू आहे.

हुमा कुरेशी आणि सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान यांच्यात डेटिंग सुरू असल्याची अफवा बॉलीवूडमध्ये आहे. सोहेल हुमाला महागडे गिफ्ट्स देत असल्याची चर्चा सुरू आहे. सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे अनेक फ्रेंड्स एक दिवसापेक्षा जास्त दिवस थांबले. त्यात हुमाही होती. हुमाने ट्विटरवर सांगितले की, ‘सोहेल हा माझ्या भावाप्रमाणे आहे.’ असेच सोहेलची पत्नी सीमा खानही म्हणाली, हुमा ही सलमान आणि अर्पिता यांची मैत्रीण आहे आणि त्यामुळे तिने हुमा आणि सोहेल यांना एकत्र असण्याचा विचारही केलेला नाही. सीमाला हुमा सलमानच्या बर्थडे बॅशमध्ये दिसली नाही. आता नेमकं कुठे पाणी मुरतंय ते कळेलच! लेट्स सी...