Join us
Daily Top 2Weekly Top 5

निती मोहनने केले या गायिकाला रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 07:15 IST

रायझिंग स्टार हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि त्यांच्यासोबत निती मोहन दिसणार आहे

ठळक मुद्देरायझिंग स्टारचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेया सीझनमध्ये आपल्याला नितीमोहन सुद्धा दिसणार आहे

रायझिंग स्टार हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि त्यांच्यासोबत निती मोहन दिसणार आहे. लवकरच निती मोहन निहार पांड्या सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. याआधी शंकर महादेवन, दिलजित दोसांझच्यासोबत आपल्याला मोनाली ठाकूर दिसली होती मात्र आता तिची जागा निती मोहनने घेतली आहे. या आधी रायझिंग स्टारचे दोनही सीझन हिट गेले होते. यानंतर हा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.  

      

निहार आणि निती दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, आता हे कपल लग्नाच्या निर्णयापर्यंत आले आहे. सूत्रांचे मानाल तर, निहार व नीति यांनी जाणीवपूर्वक लग्नाची बातमी दडवून ठेवली आहे. आपले लग्न एक खासगी सोहळा असावा, अशी दोघांची इच्छा आहे. पण येत्या फेब्रुवारीत हे कपल लग्नबंधनात अडकणार, हे पक्के मानले जात आहे.

नितीबद्दल सांगायचे झाले तर ती बॉलिवूडमध्ये एक आघाडीची गायिका आहे. जब तक है जान, सोनू के टीटू की स्वीटी असा सुपरहिट चित्रपटांसाठी तिने गायले आहे. तर निहार पांड्या लवकरच बॉलिवूड डेब्यू करतोय. कंगनाच्या राणौतच्या मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसीमधून निहार पदार्पण करतोय. 

टॅग्स :शंकर महादेवनकंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी