Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:10 IST

कान्समध्ये पदार्पण करणारी नितांशी सर्वात तरुण अभिनेत्री आहे.

'लापता लेडीज' या गाजलेल्या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री नितांशी गोयलने (Nitanshi Goel) यंदा 'कान्स'मध्ये पदार्पण केलं. कान्समध्ये डेब्यू करणार नितांशी सर्वात तरुण अभिनेत्री आहे. वयाच्या १७ व्या वर्षीच ती या फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावत आहे. कान्समधील नितांशी रेड कार्पेट लूक आता समोर आला आहे. व्हाईट रंगाच्या आऊटफिटमध्ये ती सुंदर दिसत आहे. दरम्यान नितांशी वेणीने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नितांशी गोयल कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करत आहे. रेड कार्पेटवर ती आपल्या फॅशनचा जलवा दाखवायला सज्ज आहे. तिने व्हाईट रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. यावर मोत्यांचा बॅकलेस ब्लाऊज आहे. दरम्यान तिची हेअरस्टाईल लक्ष वेधून घेत आहे. नितांशीच्या वेणीत मोत्यांचे अनेक धागे आहेत. त्यात छोटे छोटे फोटो फ्रेम्स आहेत. नितांशीन हिंदी सिनेसृष्टीतील ८ दिग्गज अभिनेत्रींचा फोटो लावत त्यांना ट्रिब्युट दिलं आहे. वहीदा रहमान, मधुबाला, रेखा, वैजयंती माला, मीना कुमारी, हेमा मालिनी, आशा पारेख आणि श्रीदेवी या अभिनेत्रींचा यात समावेश आहे. हा कस्टममेड हेअरपीस Beabhika ने डिझाईन केला आहे. 

नितांशीचा लूक पाहून चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं आहे. सर्वात तरुण अभिनेत्री जी थेट कान्समध्ये पोहोचली आहे. १३ मे रोजी या सोहळ्याला सुरुवात झाली. २४ मे पर्यंत हे फेस्टिव्हल असणार आहे. 

नितांशी गोयलने 'लापता लेडीज' मध्ये फूल ही भूमिका साकारली होती. तिच्या निरागस अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलं होतं. किरण रावने सिनेमा दिग्दर्शत केला होता. भारताकडून सिनेमा ऑस्करलाही पाठवण्यात आला होता.

टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलसेलिब्रिटी