Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट, बाबांचं सत्य न सांगितल्यामुळे कार्तिकी विचारणार दीपाला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 11:55 IST

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेत अखेर कार्तिकीला तिचे बाबा कोण आहेत, हे कळणार आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. अखेर कार्तिकीला तिचे बाबा कोण आहेत, हे कळणार आहे. कार्तिकी दीपा आणि सौंदर्याचं बोलणं ऐकतं तेव्हा तिला दीपाच्या तोंडूनच कार्तिक तिचे वडील असल्याचे समजते. बाबांचं सत्य न सांगितल्यामुळे कार्तिकी दीपाला जाब विचारणार आहे.

रंग माझा वेगळा मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे, त्यात पाहायला मिळत आहे की, कार्तिकी दीपाला म्हणते की दीपिकाच्या डॅडाच माझे बाबा आहे. त्यावर दीपा कार्तिकीला बोलते की, काय माहित आहे गं तुला? त्यावर कार्तिकी म्हणते की, मी तुझं आणि आजीचं बोलणं ऐकलंय. तुझं आणि फ्रेंडचं लग्न झालं  होतं. मी ऐकलं. आई, मी खरं बोलतं पण तू मात्र माझ्याशी खोटं बोललीस. एकदा म्हण, फ्रेंडच माझे बाबा आहेत. हे ऐकल्यानंतर दीपा कोलमडून जाते. कार्तिकीसमोर आता हे सत्य आल्यानंतर दीपाला तिला खरे बोलावे लागते. त्यानंतर दीपा कार्तिकीला त्यांच्या लग्नाचा अल्बम दाखवते. आता कार्तिकीला कार्तिकच तिचा बाबा आहे, हे समजल्यावर आता ती ही गोष्ट दीपिकाला सांगणार का?, पुढे काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

सीमा आणि श्वेताचा डाव फसतो...नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात, कार्तिकने दीपिकाला आई म्हणून दाखवलेल्या फोटोतील बाई ईनामदारांच्या बंगल्यात येते. दीपिकासोबत राहू लागते आणि ती तिला तिच तिची आई असल्याचं सांगते. कार्तिक आणि सौंदर्याने धमकी देऊनही सीमा घराबाहेर जाण्यासाठी तयार होत नाही. कारण तिला श्वेताची साथ मिळालेली असते. अखेर कार्तिक दीपा आणि कार्तिकीला घरी घेऊन येतो. एक ड्रामा कार्तिक घडवून आणतो आणि सीमाची पोलखोल दीपिकासमोर करतो. त्यानंतर सीमा ते घर सोडून जाते.

टॅग्स :स्टार प्रवाह