Join us

'आई कुठे काय करते' उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधतीनं अभिषेकला गर्लफ्रेंडसोबत पडकलं रंगेहाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 14:02 IST

Aai Kuthe Kay Karte : अभिषेकचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर अरुंधतीसमोर उघड झाले आहे

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. मात्र आता प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. आता अभिषेकचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर अरुंधतीसमोर येणार आहेत. अरुंधती अभिषेकला दुसऱ्याच एका मुलीसोबत पाहणार आहे. त्यामुळे तिला मोठा धक्का बसणार आहे.

अरुंधती आणि आशुतोष एकमेकांसोबत एकत्र आयुष्य व्यतित करण्याची स्वप्ने पाहत आहेत. अनुष्काच्या येण्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येईल असे म्हटले जात होते. मात्र तसे घडताना दिसत नाही. अरुंधती आशुतोषकडे प्रेमाची कबुली देणार होती. मात्र त्यातच मोठा ट्विस्ट येणार आहे.  अरुंधती आणि आशुतोष एकमेकांसोबत बोलण्यासाठी एका कॅफेमध्ये जातात. तिथे अरुंधती आशुतोषकडे काही बोलणार इतक्यात तिथे अभिषेक एका मुलीसोबत येताना दिसतो. अभिषेकला त्या मुलीच्या हातात हात घालून कॅफेमध्ये येताना पाहून अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे. 

अभिषेक गरोदर असलेल्या अनघाची फसवणूक करत आहे. शेवटी तोदेखील अनिरुध्दच्याच मार्गाने जाताना दाखवण्यात येणार आहे. आता अभिषेकला दुसऱ्या मुलीसोबत पाहून अरुंधती काय निर्णय घेणार, ती घरी जाऊन सगळे सांगणार की अभिषेकला ताकीद देणार, अनघा गरोदर असताना अभिषेक तिची फसवणूक करतोय हे अरुंधतीला सहन होणार का, आता पुढे अरुंधती कोणतं पाऊल उचलणार, आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नावर याचा काय परिणाम होणार का, असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडले आहेत. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
टॅग्स :आई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाह