Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मालिका येणार, या लोकप्रिय मालिका निरोप घेणार !! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 16:21 IST

येत्या दिवसांत अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता नव्या मालिका येणार म्हटल्यावर जुन्या मालिका निरोप घेणार, हे आलेच.

ठळक मुद्देनुकतीच ‘पाहिले न मी तुला’ या नव्या मालिकेचीही घोषणा झालीये. तुमचा आमचा आवडता अभिनेता शशांक केतकर या मालिकेतून कमबॅक करतोय.

कोरोना महामारीमुळे छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांना ब्रेक लागला. हळूहळू गाडी रूळावर आली आणि आता नव्या मालिकांची रेलचेल दिसतेय. येत्या दिवसांत अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता नव्या मालिका येणार म्हटल्यावर जुन्या मालिका निरोप घेणार, हे आलेच. झी वाहिनीवरील अनेक लोकप्रिय मालिकाही याचमुळे येत्या काळात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळतेय.कालपरवा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिस-या सीझनचा अर्थात ‘रात्रीस खेळ चाले 3’चा प्रोमो रिलीज झाला.

‘रात्रीस खेळ चाले 2’मध्ये अण्णा नााईक, शेवंता यांचा मृत्यू दाखवण्यात आला होता.पण सीझन 3 च्या टीझरमध्ये अण्णा नाईक दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या पर्वात काय पाहायाला मिळेल याची उत्सुकता लागून राहिलीय.‘रात्रीस खेळ चाले’ पुन्हा येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. पण त्याचवेळी या मालिकेमुळे ‘देवमाणूस’ ही मालिका गुंडाळण्यात येणार असल्याची चर्चा आहे.  ‘देवमाणूस’ ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात असल्याचे समजतेय. ‘देवमाणूस’ या मालिकेसारखीच ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेलाही नारळ देण्यात येणार असल्याचे कळतेय.

नुकतीच ‘पाहिले न मी तुला’ या नव्या मालिकेचीही घोषणा झालीये. तुमचा आमचा आवडता अभिनेता शशांक केतकर या मालिकेतून कमबॅक करतोय. त्याच्या या नव्या मालिकेमुळे ‘लाडाची मी लेक गं’ ही मालिका संपणार असल्याचे समजतेय.‘माझ्या नव-याची बायको’ आणि ‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिका या दीर्घकाळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या मालिकांचा निर्णय मात्र अद्याप झाला नाही.  ‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका बंद होणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळतेय. तेव्हा ही चर्चा खरी होणार का? या मालिकांनाही निरोप देण्यात येणार का? हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :रात्रीस खेळ चालेझी टीव्ही