Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही आहे नेपाळची ‘प्रियंका चोप्रा’, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 08:00 IST

प्रियंका चोप्राने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवले. आज ग्लोबल स्टार अशी तिची ओळख आहे. तिच्यासारखे बनायला कुणाला आवडणार नाही? नेपाळच्या एका अभिनेत्रीने हे साध्य करून दाखवले.

ठळक मुद्दे फ्रान्समध्ये आयोजित कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रियंकाने नेपाळचे प्रतिनिधित्व केले होते.

प्रियंका चोप्राने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवले. आज ग्लोबल स्टार अशी तिची ओळख आहे. तिच्यासारखे बनायला कुणाला आवडणार नाही? नेपाळच्या एका अभिनेत्रीने हे साध्य करून दाखवले. आज त्याचमुळे तिची तुलना प्रियंका चोप्राशी होते. प्रियंकाशी तुलना होणा-या या अभिनेत्रीचे नाव आहे, प्रियंका कार्की. होय, नेपाळी सिनेमातील तिचा अभिनय आणि बोल्डेनेसमुळे ती सतत चर्चेत असते. उण्यापु-या सात वर्षांत तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

27 फेबु्रवारी 1987 मध्ये काठमांडू येथे प्रियंकाचा जन्म झाला. शिक्षणात तिला आधीपासूनच गती होती. अमेरिकेत तिने उच्चशिक्षण घेतले. युनिव्हर्सिटी आॅफ नॉर्थ अलाबामामधून फिल्म मेकिंगची डिग्री घेतली. यामुळेच आज तिला ‘ब्युटी विद ब्रेन’ही म्हटले जाते.

2005 मध्ये तिने ब्युटी पेजेंटमध्ये भाग घेतला आणि मिस टीन नेपाळचा किताब जिंकला. 2006 मध्ये कांतीपूर टेलिव्हिजनच्या ‘सेल्युलॉयड’ नामक प्रोग्रामध्ये काम केले आणि यानंतर लगेच ‘द ग्लॉम फॅक्टर’ नामक फॅशन व लाईफस्टाईल प्रोग्राम सुरु केला.

नेपाळी सिनेमात येण्यापूर्वी तिने व्हीजे, सिंगर, कोरिओग्राफर, मॉडेल अशा अनेक भूमिका पार पाडल्या. फोलिया मॅगझिनने  प्रियंकाला नेपाळची चौथी सर्वाधिक सेक्सिएस्ट महिला म्हणून निवडले.प्रियंका अनेक वादातही अडकली. 2014 मध्ये एका चित्रपटाच्या सक्सेस पार्टीदरम्यान तिचा एक फोटो वादात सापडला होता. यात प्रियंकाचे अंर्तवस्त्र हायलाईट केले गेले होते. यावरून बरीच खळबळ माजली होती. यानंतर हा फोटो फोटोशॉप्ड असल्याचा दावा प्रियंकाने केला होता. यानंतर संबंधित फोटोग्राफरनेही प्रियंकाविरोधात केस दाखल केली होती. पुढे प्रियंकाने सारवासारव करून हे प्रकरण मिटवले होते.

2015 मध्ये नेपाळमध्ये मोठा भूकंप आला होता. या भूकंपाच्या दोन दिवसानंतर प्रियंकाने कार खरेदी केली होती. प्रियंकाने भूकंप पीडितांसाठी जमा केलेल्या पैशातून कार खरेदी केली, असा आरोप तिच्यावर झाला होता.

अ‍ॅक्टिंगसोबतच सिंगींगमध्येही प्रियंका अव्वल आहे. प्रियंका चोप्रा तिच्या सिंगींगसाठी ओळखली जाते. अगदी तशीच नेपाळची ही प्रियंकाही तिच्या या टॅलेंटसाठी प्रसिद्ध आहे. ‘आवारन’ या नेपाळी सिनेमाद्वारे तिने सिंगींग करिअरची सुरुवात केली होती. तिने गायलेल्या गाण्याला 24 तासांत 50 हजार व्ह्युज मिळाले होते.

यावर्षी फ्रान्समध्ये आयोजित कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रियंकाने नेपाळचे प्रतिनिधित्व केले होते.

टॅग्स :प्रियंका चोप्रा