Join us

GOOD NEWS !! नेहा धूपिया-अंगद बेदी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:37 IST

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया दुसऱ्यांदा आई झाली आहे. दोघांना पहिली मुलगी आहे.

ठळक मुद्दे नेहाने 2003 मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून  बॉलिवूड डेब्यू केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया  (Neha Dhupia) दुसऱ्यांदाआई झाली आहे. नेहाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. नेहाचा पती अंगद बेदीने (Angad Bedi) सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली. दोघांना पहिली मुलगी आहे.गेल्या जुलै महिन्यात नेहा व अंगदने एक फोटो शेअर करत, नेहाच्या प्रेग्नंसीची माहिती दिली होती. आज अंगदने नेहासोबत एक फोटो शेअर बाप झाल्याची माहिती दिली.‘आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. नेहा व बाळ सुखरूप आहेत,’ अशी पोस्ट त्याने केली आहे.

नेहा धूपिया आणि अंगद बेदीनं 10 मे 2018 ला लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर काहीच महिन्यांनी नेहानं प्रेग्नंट असल्याचे जाहीर केलं होतं. यानंतर नेहा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली होती. नोव्हेंबर 2018 रोजी नेहाने कन्यारत्नाला जन्म दिला होता. 

लग्नाच्या चार वर्षांआधी अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण तेव्हा नेहा कुण्या दुस-यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा व अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला होता. नेहाने 2003 मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून  बॉलिवूड डेब्यू केला होता. ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणा-या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  उंगली, पिंक, टायगर जिंदा है  या चित्रपटांतही तो झळकला.

टॅग्स :नेहा धुपियाअंगद बेदी