Join us  

Koffee With Karan 8 : "जया बच्चन आणि पापाराझींची मिली भगत", नीतू कपूर स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 1:30 PM

नीतू कपूर यांनी केली जया बच्चन यांची पोलखोल, म्हणाल्या, "त्या पापाराझींबरोबर..."

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन कायमच चर्चेत असतात. अनेकदा जया बच्चन यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पापाराझी आणि जया बच्चन यांचा ३६चा आकडा आहे. पापाराझींवर अनेकदा जया बच्चन भडकताना दिसतात. कित्येकदा पापाराझींच्या वागण्यावर नाराजगी व्यक्त करत जया बच्चन त्यांच्यावर ओरडतानाचे व्हिडिओही समोर आले होते. त्यामुळे जया बच्चन यांच्या स्वभावाबद्दलही चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा यावरुन जया बच्चन यांना ट्रोलही केलं गेलं होतं. आता नीतू कपूर यांनी करण जोहरच्या शोमध्ये याबाबत भाष्य करत जया बच्चन यांची पोलखोल केली आहे. 

'कॉफी विथ करणच्या ८'व्या सीझनलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीझनमध्ये आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आता ८०च्या दशकातील बॉलिवूडमधील दोन हसीना करण जोहरच्या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी कॉफी विथ करणच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात हजेरी लावली होती. यावेळी नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी एकमेकींचे सिक्रेट सांगितले. तर नीतू कपूर यांनी जया बच्चन आणि पापाराझींबद्दलही भाष्य केलं. जया बच्चन हे मुद्दाम करत असल्याचा खुलासा नीतू कपूर यांनी केला.

त्या म्हणाल्या, "जया अशी नाही आहे. ते एक वेळेस झालं. म्हणून ती आताही तसं करते." यावर करण म्हणतो, "पापाराझीही त्यांचं हे वागणं एन्जॉय करतात." पुढे नीतू कपूर "जया बच्चन आणि पापाराझी दोघेही याचा आनंद घेतात. दोघांची मिली भगत आहे", असं म्हणतात. नीतू कपूर यांनी जया बच्चन यांच्याबद्दल केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

टॅग्स :नितू सिंगजया बच्चनकरण जोहर