Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्या गोष्टीचा मला फटका बसला...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्याने सांगितला कटू अनुभव, म्हणाला- "वडील गेल्यानंतर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:23 IST

'नवरी मिळे हिटलर'ला या मालिकेने नुकताच प्रेक्षकांच्या निरोप घेतला.

Navri Mile Hitlarla : 'नवरी मिळे हिटलर'ला या मालिकेने नुकताच प्रेक्षकांच्या निरोप घेतला. या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज आणि राकेश बापट ही फ्रेश जोडी एकत्र पाहायला मिळाली. लीला-एजेच्या या सुंदर केमिस्ट्रीने मालिका रसिकांची मनं जिंकली आहे. दरम्यान, या मालिकेत अभिनेता प्रसाद लिमयेने किशोर ही खलनायकी भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. अशातत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसादने त्याच्या आयुष्यातील कटू अनुभव सांगितला आहे. 

अभिनेता प्रसाद लिमयेने नुकतीच 'मराठी मनोरंजनविश्व' चॅनेलला मुलाखत दिली. त्यादरम्यान अभिनेत्याने धक्कादायक खुलासा केला. त्यावेळी प्रसाद म्हणाला, मधल्या काळामध्ये माझे बाबा जेव्हा गेले त्यानंतर काही लोकांनी सगळ्यांना असं सांगितलं होतं की, प्रसाद लिमयेला वडिलांच्या जागी रेल्वेत नोकरी लागली. मी हेही सांगतो, मला नोकरी आली होती. बाबांचे सगळ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे मला ट्रान्सफर करुन मुंबईत पाठवत होते. पण, मी तेव्हा डीआरएम ऑफिसला जाऊन तिथून लेटर घेऊन आलो होतो. सुरुवातीला पगारही चांगला होता. पण, ती नोकरी मी नाही केली. त्यावेळी काही लोकांनी अशा अफवा पसरवल्या की तो आता काम करत नाही. तो जॉब करतो. आता रेल्वेची नोकरी आणि अभिनय तो कसा करेल असं सांगण्यात आलं. या गोष्टी मला माहितच नव्हत्या. त्यामुळे मधला काळ असा गेला की मला कामासाठी येणारे फोन बंद झाले. लोकांना मी भेटायचो, कामासाठी विचारणा करायचो तरीही फोन यायचे नाही."

त्यानंतर अभिनेता म्हणाला, "मला एका निर्मात्यांच्या पत्नीचा फोन आला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, तुला कामाची गरज नाही, तू जॉब करतोस असं तुझ्याबद्दल म्हटलं जात आहे. हे खरं आहे? का त्या गोष्टीचा मला खूप मोठा फटका बसला. तो माझ्यासाठी वाईट अनुभव होता त्यामुळे गप्प बसावं आणि कोणाला काही सांगू नये असं वाटतं." असा खुलासा अभिनेत्याने केला.

अभिनेता प्रसाद लिमयेच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने 'नवरी मिळे हिटलरला', 'नकळत सारे घडले' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तो 'फत्तेशिकस्त' या मराठी चित्रपटामध्ये देखील झळकला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी