Join us
Daily Top 2Weekly Top 5

...असा आहे कंगना रानौतचा स्वभाव, अंकिता लोखंडेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 21:00 IST

अंकिता लोखंडे कंगना रानौतसोबत मणिकर्णिका चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देकंगनाला थेट बोलण्याची सवय - अंकिता लोखंडेकंगना आहे चांगली व्यक्ती - अंकिता लोखंडे

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना कंगनाचा स्वभाव खटकतो. ज्यामुळे बहुतेक कलाकार कंगनासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. अशात नुकतेच अंकिता लोखंडेने कंगनासोबत 'मणिकर्णिका' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. ती या चित्रपटात झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीचा कंगनासोबतचा अनुभव तिने एका मुलाखतीदरम्यान शेअर केला.

अंकिता लोखंडे कंगनाबद्दल म्हणाली की, ती एक खूप चांगली व्यक्ती आहे. तिला थेट बोलण्याची सवय आहे. तिची हिच सवय अनेकांना खटकते. 'मणिकर्णिका'च्या स्क्रिप्टमध्ये तिने काहीही हस्तक्षेप केला नाही. मात्र, जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश हा चित्रपट सोडून गेले, तेव्हा दिग्दर्शनाची जबाबदारी कंगनाकडे आली. यानंतर तिने चित्रपटात काही सीनमध्ये बदल केला.

कंगनाचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा सिनेमा राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा आहे. यात कंगना राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे कंगना प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवतेय.

कंगनाने ४५ दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटींग सांभाळले. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ला बॉक्सआॅफिसवर किती यश मिळते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.'मणिकर्णिका'  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौतअंकिता लोखंडे