Join us  

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 6:21 PM

तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट अजून पाहिले नसतील, तर तुम्ही ते या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज दिल्लीमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं.  आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीपासून ते आर माधवनच्या 'रॉकेटरी द नंबी इफेक्ट'पर्यंत पुरस्कार मिळाले आहेत. तुम्ही हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट अजून पाहिले नसतील, तर तुम्ही ते या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

या यादीत पहिले नाव एसएस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाचे आले आहे. हा चित्रपट 2021 मध्ये ब्लॉकबस्टर ठरला. राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, RRR ने अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले. डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. इतकेच नाही तर त्याच्या 'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्करही पटकावला आहे. 

संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये 4 श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. संजय लीला भन्साळीला सर्वोत्कृष्ट एडिटिंग तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

अल्लू अर्जुनला 'पुष्पा: द राइज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. आज हा पुरस्कार अल्लू अर्जुनला प्रदान करण्यात येणार आहे.  अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर  तुम्ही 'पुष्पा: द राइज'  हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामधील डायलॉग्स आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.  'पुष्पा: द राइज'  या चित्रपटामधील ऊ अंटवा, सामी सामी, श्रीवल्ली या गाण्यावर अनेकांनी ठेका धरला.

आर माधवनचा 'रॉकेट्री द नंबी इफेक्ट' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली, तरी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. हा चित्रपट  तुम्ही तो Jio सिनेमावर पाहू शकता.

'होम' हा एक मल्याळम चित्रपट आहे. ज्याने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्याचा मल्याळम चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. तुम्ही हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम वर पाहू शकता. तर 'गोदावरी' चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारबॉलिवूडअल्लू अर्जुनआलिया भट