Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...! हार्दिक पंड्याला किस करतानाचा नताशाचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 11:15 IST

मॉडेल नताशा स्टेन्कोविक आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या हे लोकप्रिय कपलपैकी एक आहे.

मॉडेल नताशा स्टेन्कोविक आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या हे लोकप्रिय कपलपैकी एक आहे आणि बर्‍याचदा चर्चेत असतात. हे दोघेही रोज आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नताशा स्टेन्कोविकने हार्दिक पांड्याबरोबर एक फोटो  पोस्ट केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडेल.

नताशा  स्टेन्कोविकने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यात ती हार्दिक पंड्यासोबत स्विमिंग पूलमध्ये दिसतेय   आणि त्याच्या गालावर किस देतेय.  नताशा स्टेन्कोविकने या फोटोसह लिहिले आहे, 'माझे सनशाईन हार्दिक पांड्या.'

नताशा स्टेन्कोविकने  नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर लिहिले की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा माय बेबी. वाढदिवस तुझा आहे परंतु मला वाटते तू मला अगस्त्यच्या रुपात  सर्वात चांगली भेट दिली आहे. हार्दिक पांड्याच्या पत्नीने ३० सप्टेंबर, २०२० ला मुलाला जन्म दिला होता.

नताशा स्टँकोव्हिच ही सर्बियन मॉडल आहे. नताशाला २०१० मध्ये ‘मिस स्पोर्ट्स ऑफ सर्बिया’हा अवॉर्ड मिळवला होता. २०१२ मध्ये जाहिरातींच्या माध्यमातून नताशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रॉपर बादशाहाच्या डीजे वाले बाबू या अल्बममध्ये नताशा दिसली होती. नताशाने १७ वर्ष बॅले डान्स प्रकाराचं प्रशिक्षणही घेतलं आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच