Join us  

'अरे होगा तुमसे प्यारा कौन' गाण्यावर थिरकलं नारकर कपल, व्हिडीओला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 10:41 AM

Aishwarya Narkar-Avinash Narkar : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. ही जोडी सातत्याने चर्चेत येत असते. बऱ्याचदा ते दोघे सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असतात.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar). ही जोडी सातत्याने चर्चेत येत असते. बऱ्याचदा ते दोघे सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांचे हे व्हिडीओ चर्चेतदेखील येत असतात. दरम्यान आता त्यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ते दोघे अरे होगा तुमसे प्यारा कौन या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय असून ते नेहमीच चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात बऱ्याचदा त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याचे अपडेटही देतात. तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्रेंडही फॉलो करत असतात. त्यांचे हे ट्रेडिंग रिल्स बऱ्याचदा व्हायरल होत असतात.

बऱ्याचदा ऐश्वर्या नारकर त्यांचा नवरा अभिनेता अविनाश नारकर यांच्यासोबतही रिल्स बनवत असतात. त्यांचे रिल्सही व्हायरल होतात. या वयात त्यांची एनर्जी पाहून चाहते त्यांचे कौतुक करताना दिसतात. दरम्यान आता त्यांनी होगा तुमसे प्यारा कौन या गाण्यावर रिल बनवला आहे. यात ते दोघे थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.  

वर्कफ्रंटअभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत अभिनय करत आहेत. या मालिकेत ऐश्वर्या साकारत असलेल्या रुपाली राजाध्यक्ष भूमिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. त्या मालिकेत  खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. तर अविनाश नारकर सन मराठी वाहिनीवरील कन्यादान मालिकेत काम करत होते. या मालिकेने नुकतीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.  

टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकर