Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना दीदीचे अख्खे करिअर...! नगमाने शेअर केले मीम अन् भडकली ‘क्वीन’ची टीम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 17:33 IST

कंगना-नगमात जुंपली

ठळक मुद्देआदित्य तिला मारायचा आणि त्याने कंगनाला अनुराग बासूशी भेट घालून दिलेली नाही,’ असे पहिले ट्वीट कंगनाच्या टीमने केले.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना राणौत प्रचंड चर्चेत आहेत. एका ताज्या मुलाखतीत कंगनाने सुशांतचा मृत्यू प्लान्ड मर्डर असल्याचा दावा केला. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूडमधील नेपोटिजमवर बोलताना अनेक सेलिब्रिटींवर निशाणाही साधला. या आरोपानंतर कंगनालाही लक्ष्य केले जात आहे. कंगना संधीसाधू असल्याची टीका होत आहे. आता पूर्वाश्रमीची अभिनेत्री व राजकीय नेता नगमाने कंगनाला लक्ष्य केले आहे.नगमाने एक मीम शेअर करत कंगनावर तोफ डागली. नेपोटिजमच्या बळावरच कंगनाने आपले अख्खे करिअर उभे केलेय, असे या मीममध्ये म्हटले आहे. नगमाने हे मीम शेअर करताना कंगनाची टीम मैदानात उतरली आणि मग काय, एकापाठोपाठ एक ट्वीटचा पाऊस पडला.

‘नगमाजी, आदित्य पांचोली कंगनाचा बॉयफ्रेन्ड नव्हता. कंगनाने अनेकदा हे स्पष्ट केले. सुरुवातीला आदित्यने कंगनाला मेंटॉर करण्याचा शब्द दिला होता. मात्र हळूहळू आदित्य कंगनासाठी त्रासदायक ठरू लागला. कंगना आॅडिशन्ससाठी गेली की, आदित्य तिला मारायचा आणि त्याने कंगनाला अनुराग बासूशी भेट घालून दिलेली नाही,’ असे पहिले ट्वीट कंगनाच्या टीमने केले.

पुढे दुस-या ट्वीटमध्ये कंगनाच्या टीमने लिहिले, ‘बासू आदित्य पांचोलीला ओळखतही नव्हते. कंगनाचे करिअर खराब झाले होते कारण काइट्स या सिनेमात तिचा रोल कापला गेला. यामुळेच तिला क्रिशमध्येही काम करायचे नव्हते. पण तिला बळजबरीने या सिनेमात काम करायला भाग पाडले गेले.

यानंतर तिस-या ट्वीटमध्ये कंगनाच्या टिमने लिहिले, ‘कुठलीच एजन्सी कंगनाला हायर करायला तयार नव्हती. कारण ती वेडिंग्समध्ये नाचत नव्हती, फेअरनेस क्रिमच्या जाहिरातील करत नव्हती. म्हणून रंगोलीने कंगनासाठी काम करणे ुरु केले. रंगोलीला सुद्धा आधी इंग्लिश येत नव्हती. या बिझनेसबद्दल तिलाही काहीही ठाऊक नव्हते. पण अशास्थितीत तिने बहिणीला मदत केली. प्लीज खोट्या गोष्टी पसरवणे बंद करा.’ 

टॅग्स :कंगना राणौत