Join us

नागराजचा ‘सैराट’ डान्स

By admin | Updated: April 13, 2016 01:30 IST

एखादं गाणं असं असतं की, ते लागल्यावर आपोआपच पाय थिरकायला लागतात अन् हळूहळू डान्स करायची झिंगच चढते. अशीच झिंग चढलीय ती सैराट नागराज मंजुळे यांना. दर्जेदार चित्रपटांचे

एखादं गाणं असं असतं की, ते लागल्यावर आपोआपच पाय थिरकायला लागतात अन् हळूहळू डान्स करायची झिंगच चढते. अशीच झिंग चढलीय ती सैराट नागराज मंजुळे यांना. दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे नागराज मंजुळे जर आपल्याला एकदम सैराट अंदाजात डान्स करताना पाहायला मिळाले, तर जास्त आश्चर्यचकित होऊ नका. कारण सध्या त्यांच्यावर झिंग चढलीय झिंगाटची. नागराज मंजुळे त्यांच्या संपूर्ण टीमसह झिंगाट झाले आहेत. नेहमी शांत दिसणारे नागराज मंजुळे असे एकदम सैराट कसे काय झाले, वाटत असेल ना! तर मग त्याचे कारण आहे झिंगाट. ‘सैराट’ या चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणे सगळीकडे एकदम सुसाट सुटलंय. असाच झिंगाटचा फिवर चढलाय मंजुळे यांच्यावर. सैराटचे सर्व कलाकार संगीतकार अजय-अतुल हे सर्व जण एकत्र जमले अन् झिंगाट गाणे लावून मनाला वाटेल तसा अगदी मनमुराद डान्स या सगळ्यांनी केला. नागराज मंजुळे यांच्या बेहतरीन मूव्हज या वेळी पाहायला मिळाल्या अन् काय खरंच त्यांच्या चाहत्यांना मोह वाटेल, असा डान्स त्यांनी केला.