Join us

'दिव्य दृष्टी'मधील आध्विक महाजन म्हणतो, माझ्या पत्नीला नाही इंटिमेट सीनचा प्रॉब्लेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 07:15 IST

स्टार प्लसवरील ‘दिव्य दृष्टी’ मालिका एका रंजक वळणावर आली आहे.

स्टार प्लसवरीलदिव्य दृष्टी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना लोकप्रिय जोडपे रक्षित (आध्विक महाजन) आणि दृष्टी (सना सय्यद) यांच्यातील प्रेमप्रसंग आणि चुंबनदृष्ये पाहायला मिळणार आहेत. 

अगदी निकटचे प्रेमप्रसंग साकार करताना त्याला काही संकोच वाटला का, असे विचारल्यावर आध्विक महाजन म्हणाला, “मी प्रथमच मालिकेत चुंबन दृष्याचा प्रसंग चित्रीत केला आहे. सना आणि माझ्यातील काही प्रेम प्रसंग यापूर्वीही प्रेक्षकांनी पाहिले असले, तरी आता त्यांना प्रथमच आमच्यातील निकटची प्रणयदृष्ये पाहायला मिळणार आहेत. अशा प्रसंगांमधील संकोचाच्या भावनेबद्दल म्हणाल, तर मी एक अभिनेता आहे आणि माझा प्रत्येक प्रसंग ही एक यांत्रिक प्रक्रिया आहे. पटकथेची जर तशी मागणी असेल, तर मला असे प्रसंग साकार करण्यात काहीच संकोच वाटणार नाही. सना आणि मी वास्तव जीवनात एकमेकांचे सच्चे मित्र असल्याने आमच्यात मोकळेपणा आहे. त्यामुळे अशी चुंबन दृष्ये साकार करताना आम्हाला काही संकोचल्यासारखे वाटले नाही.” 

त्याच्या पत्नीची (नेहा महाजन) अशा निकटच्या प्रेमप्रसंगांवर काय प्रतिक्रिया होती, असे विचारल्यावर आध्विक म्हणाला, “नेहा मला कॉलेजच्या दिवसांपासून ओळखते. एका अभिनेत्याचे काय काम असते आणि माझी कोणत्याही भूमिकेबद्दलची तळमळ यांची तिला चांगलीच जाणीव आहे. पडद्यावर मी चुंबनदृष्य देण्याबद्दल तिला कसलीच हरकत नाही. किंबहुना हे चुंबनदृष्य वास्तव वाटावं, यासाठी मी काय करावं, याच्या सूचनाही तिने मला दिल्या. जीवनात या टप्प्यावर पोहोचण्यासाठी आम्ही दोघांनी खूप त्याग केला आहे. त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना आधार देत असतो. मला यशस्वी झालेले पाहिल्यावर तिला आनंद होतो.”

आध्विक महाजन आणि सना सय्यद यांच्यातील ही निकटची प्रणयदृष्ये पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत.

टॅग्स :दिव्य दृष्टीस्टार प्लस