Join us

Bigg Boss 17 Finale: मुनव्वर फारुकीचा आज वाढदिवस, डबल सेलिब्रेशनची संधी मिळणार? पोल काय सांगतो बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 16:28 IST

सोशल मीडियावरील पोलनुसार कोण जिंकणार 'बिग बॉस 17' ची ट्रॉफी?

Bigg Boss 17 finale:  'बिग बॉस 17'चा महाअंतिम सोहळा आज रंगणार आहे. अंकिता लोखंडे, मुन्नावर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा या पाच सदस्यांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.दरम्यान वोटिंग लाईन्स बंद झाल्या असून कोण ठरणार बिग बॉस 17 चा विजेता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रात्री 12 वाजता विजेतेपदाची घोषणा होणार आहे. चाहत्यांचा लाडका मुन्नावर फारूकीचा (Munawar Faruqui) आज वाढदिवसही आहे. त्यामुळे मुन्नावरला डबल सेलिब्रेशनची संधी मिळणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

सोशल मीडियावरील पोल नुसार पाच सदस्यांपैकी मुन्नावर फारुकीलाच जास्त वोट्स मिळाले आहेत. मुन्नावरने आपल्या इनोसंट आणि मजेशीर स्वभावाने सर्वांचंच मन जिंकलं आहे. स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या मुन्नावरने बिग बॉसच्या घरातील वातावरणही हसतं खेळतं ठेवलं. एक्स गर्लफ्रेंड आयेशा खानही यावेळी त्याच्यासोबत घरात सहभागी झाली होती. मात्र मुन्नावरचं नाव मन्नारा चोप्रासोबत जोडलं गेलं. शिवाय त्याची आणि अंकिताची मैत्री चर्चेत होती. मात्र शोच्या शेवटच्या काही दिवसात दोघांमध्ये खटके उडाले. यामुळे अंकिता आणि मुन्नावरच्या चाहत्यांमध्ये खुन्नस निर्माण झाली. ई टाइम्सच्या एका पोलनुसार मुन्नावरला 64% वोट्स मिळाले आहेत. तर अंकिताला केवळ 29.1% वोट मिळाले आहेत. यानंतर अभिषेक कुमार 3.6%, मन्नारा आणि अरुण माशेट्टीला 3.3% वोट्स मिळाले आहेत. याचाच अर्थ मुन्नावर आघाडीवर आहे. 

आता प्रत्यक्षात बिग बॉसने काढलेल्या वोटच्या आधारे अंतिम विजेता ठरणार आहे. दरम्यान सोशल मीडियावरील वोटनुसार मुन्नावरचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे आपल्या वाढदिवशी मुन्नावरला हे आयुष्यभराचं गिफ्ट मिळण्याची संधी आहे. तरी शेवटी निकाल हा प्रेक्षकांच्याच हातात आहे.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडेसलमान खानटिव्ही कलाकार