Join us  

मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 6:01 PM

मुग्धा आणि तिची आई मालाडमधील एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथे नेमकं काय घडलं?

मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसेने (Mugdha Godse) 'फॅशन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मुग्धा नंतर मोजक्याच सिनेमांमध्ये दिसली. अभिनेता राहुल देवसोबत ती काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. राहुल देव मुग्धाहून १८ वर्षांनी मोठा असल्याने त्यांचं नातं कायमच चर्चेत असतं. पण आता मुग्धा वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड येथील एका मॉलमधील कॅफेत तिच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाल्याची माहिती तिने  ट्वीट करत दिली. 

मुग्धा आणि तिची आई मालाडमधील एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथे नेमकं काय घडलं हे सांगताना मुग्धा लिहिते, "हे फारच चूक आहे. मुंबईच्या मालाड पश्चिम येथील इनऑर्बिट मॉलमधील चायोस या आऊटलेटच्या HRने हे गांभीर्याने घ्यावं. काल माझी आई आणि मी शॉपिंग करुन थकल्यावर चहा ऑर्डर केला. मला बाजूच्या आऊटलेटमधून एक वस्तू घ्यायची होती म्हणून मी फक्त ५ मिनिटं आईला एकटीला सोडून गेले होते. मी परत आले तेव्हा बघते तर काय माझी आई हातात ज़ड शॉपिंगच्या बॅग्स घेऊन चायोसबाहेर बाहेर उभी होती. मी विचारलं तेव्हा कळलं की 6-7 मुलांचा एक ग्रुप आल्याने माझ्या ७० वर्षांच्या आईला स्टाफने सीटवरुन उठवलं होतं. मी नम्रपणे चायोसच्या स्टाफ मॅनेजर दृष्टीच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली तर तिने उलट चूक स्वीकारलीच नाही हे पाहून मला धक्काच बसला. आपल्या देशात जिथे मोठ्यांचा आदर केला जातो तिथे अशी वागणूक मिळणं कितपत योग्य आहे? चायोसच्या सर्व्हिसवर मी आज खूप निराश झाले आहे."

मुग्धाने ट्विटरवर हे सर्व लिहिलं आहे. यावर युझर्सनेही संतप्त प्रतिक्रिया देत काही जणांना असेच अनुभव आल्याचं शेअर केलं आहे. 'आजकाल माणूसकीच राहिलेली नाही' अशी नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :मुग्धा गोडसेपरिवारमराठी अभिनेताबॉलिवूडसोशल मीडिया