Join us
Daily Top 2Weekly Top 5

 एका एपिसोडसाठी किती फी घेतात ‘कसौटी जिंदगी की 2’चे स्टार्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 11:32 IST

एकता कपूर निर्मित ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले आहे. पार्थ समथान, एरिका फर्नांडिस, हिना खान आणि करण सिंग ग्रोव्हर अशा दिग्गजांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका टीआरपी चार्टमध्ये वरच्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्दे कसौटी जिंदगी की या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.

एकता कपूर निर्मित ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले आहे. पार्थ समथान, एरिका फर्नांडिस, हिना खान आणि करण सिंग ग्रोव्हर अशा दिग्गजांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका टीआरपी चार्टमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. आज आम्ही या मालिकेतील स्टार्स किती फी घेतात, हे तुम्हाला सांगणार आहोत.  IB टाइम्सने आपल्या वृत्तात या स्टार्सच्या फीचा खुलासा केला आहे.

एरिका फर्नांडिस

एरिका या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारते आहे. प्रेरणाच्या भूमिकेने एरिकाला कधी नव्हे इतकी प्रसिद्धी मिळाली. एरिका एका एपिसोडसाठी 1.2 लाख रूपये घेते.

पार्थ समथान

अनुरागची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथान याची पडद्यावरची अदाकारी सगळ्यांनाच आवडते.  IB टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पार्थ एका एपिसोडसाठी 1 लाख रूपये घेतो.

करण सिंग ग्रोव्हर

टीव्हीचा हँडसम हंक करण सिंग ग्रोव्हर या मालिकेत मिस्टर बजाजची भूमिका साकारतो आहे. एकता कपूरला मिस्टर बजाजच्या भूमिकेसाठी करणच हवा होता. करणने या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी 3 लाख रूपये मानधन मागितले होते. एकताने त्याची ही अट पूर्ण केली.

हिना खान

कसौटी जिंदकी के 2ची कोमोलिका अर्थात हिना खान हिने पहिल्यांदा छोट्या पडद्यावर निगेटीव्ह भूमिका साकारली. सध्या ती या शोमधून बाहेर झालीय. पण त्यापूर्वी प्रत्येक एपिसोडसाठी ती 2 लाख रूपये घ्यायची. पूजा बॅनर्जी

अनुरागच्या बहीणीची म्हणजेच निवेदिता बसूची भूमिका साकारणारी पूजा बॅनर्जी प्रत्येक एपिसोडसाठी 65 हजार रूपये फी घेते. कसौटी जिंदगी की या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2