Join us  

मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 9:49 AM

Mrunal dusanis: मृणालने २०१६ मध्ये लग्न केलं अन् तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. लग्नानंतर मृणाल अमेरिकेत स्थायिक झाली.

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या पहिल्याच मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस (Mrunal dusanis). 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' अशा मोजक्या मालिकांमध्ये ती झळकली. मात्र, या प्रत्येक मालिकेच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली. परंतु, मृणालने २०१६ मध्ये लग्न केलं अन् तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. लग्नानंतर मृणाल अमेरिकेत स्थायिक झाली. विशेष म्हणजे मृणाल नुकतीच भारतात परत आली असून आता चाहते तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

अमेरिकेहून भारतात परतलेल्या मृणालने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी सध्या ती भारतात आल्यानंतर काय करतीये हे तिने सांगितलं.

सध्या काय करतीये मृणाल?

"अनेकांना वाटतंय की मी फक्त सुट्ट्यांसाठीच भारतात आले आहे. पण, तसं अजिबात नाहीये. मी कायमस्वरुपी भारतात रहायला आले आहे. काही दिवसांपूर्वीच मी भारतात परतल्यामुळे सध्या माझं घर लावतीये.  आता मी ठाण्याला शिफ्ट होऊन सगळ्या गोष्टी पूर्वपदावर आणतीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे  माझ्या लेकीचं रुटीन मी लावतीये. कारण, अमेरिकेहून भारतात येणं हा तिच्यासाठी पण मोठा बदल होता", असं मृणाल म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझ्या लेकीचं नाव नुर्वी आहे. आशीर्वाद या अर्थानुसार मी तिचं नाव ठेवलंय. आमच्या लग्नाला आता ८ वर्षे झाली असून सुरुवातीला कामामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देता आला नाही. पण, मी अमेरिकेला गेल्यावर आम्हाला एकत्र राहता आलं, वेळ देता आला. मग, आम्हाला बाळ झालं. एकंदर चार वर्षे छान गेली आणि आता हळूहळू मी कामाला सुरुवात करणार आहे.”

टॅग्स :मृणाल दुसानीसटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी