Join us  

तब्बल 21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत ठरला 'मिसेस वर्ल्ड'चा मानकरी, जाणून घ्या कोणी पटकावला हा खिताब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 9:59 AM

Mrs. World 2022: तब्बल २१ वर्षांच्या प्रतिक्षेनतंर भारतानं मिसेज वर्ल्डचा किताब जिंकला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

Sargam Koushal Mrs. World 2022:  तब्बल २१ वर्षांच्या प्रतिक्षेनतंर भारतानं मिसेज वर्ल्डचा किताब जिंकला आहे. सरगम कौशल मिसेस वर्ल्ड २०२२ची विजेती ठरली आहे, हा क्षण सगळ्यांसाठी आनंदाचा आणि भावनिक होता. लास वेगासमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मिसेस वर्ल्ड २०२२' स्पर्धेत ६३ देशांतील स्पर्धकांना मात देत सरगमनं विजेतेपद पटकावलं आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

सरगम कौशलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या क्षणाची एक झलक शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये 'मिसेस वर्ल्ड'च्या नावाची घोषणा झाल्यावर सरगमला तिचे नाव ऐकून धक्काच बसला. तिला अश्रू अनावर झालं. या भावनिक क्षणाची एक झलक शेअर करताना सरगमने कॅप्शनमध्ये लिहिले की, "प्रदीर्घ प्रतीक्षा संपली, २१ वर्षांनंतर आपल्याकडे ताज परत आला आहे!" यावेळी सरगम ​​कौशलने ब्लूश पिंक कलरचा लाँग गाउन परिधान केला होता. अभिनेत्रीने तिचा लूक डायमंड इअररिंगसह पूर्ण केला. ग्लॉसी न्यूड मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

कौण आहे मिसेस वर्ल्ड २०२२ सरगम कौशल?सरगम कौशल ही जम्मू-काश्मीरची आहे. तिनं इंग्रजी लिटरेचरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. मॉडलिंगच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी ती  विशाखापट्टणमच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर आदित्य मनोहर शर्मा यांच्याशी तिचा विवाह झाला  आहे.

२१ वर्षांपूर्वी कोण जिंकला बनली होती मिसेस वर्ल्ड?प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात मिसेस वर्ल्डचा खिताब परत आला आहे. २१ वर्षांपूर्वी २००१मध्ये डॉ.अदिती गोवित्रीकर मिसेस वर्ल्ड झाली होती.  यावर्षी ती 'मिसेस वर्ल्ड 2022'ची जज म्हणून दिसली.

 

टॅग्स :विश्वसुंदरीभारत