Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मोरया मोरया’चा यूट्युबवर धुमाकूळ

By admin | Updated: September 23, 2015 00:12 IST

गणेशोत्सवामध्ये गणपतीवर आधारित गाणे हिट होण्याचा इतिहास तसा नवीन नाही़ या उत्सवामध्येच गल्लीबोळातून ते वाजले जावे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून ते रिलीज केले जाते.

गणेशोत्सवामध्ये गणपतीवर आधारित गाणे हिट होण्याचा इतिहास तसा नवीन नाही़ या उत्सवामध्येच गल्लीबोळातून ते वाजले जावे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून ते रिलीज केले जाते. आठवडाभरापूर्वी ‘दगडी चाळ’ चित्रपटातील ‘मोरया मोरया’ हे गाणं रिलीज झालं आणि यूट्युबवर या गाण्यानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं जात असून, गणरायाच्या या गाण्याचे गणेशभक्तांनी स्वागत केले आहे.