Join us

'मोआना 2' ची लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्सुकता, या दिवशी भारतात होणार प्रदर्शित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 12:43 IST

'मोआना' हा सिनेमा 2016 मध्ये आला होता. त्याचा सिक्वेल 'मोआना 2' आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ॲनिमेटेड चित्रपट 'मोआना 2' या सिनेमाची लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्सुकता आहे. 'मोआना' हा सिनेमा 2016 मध्ये आला होता. त्याचा सिक्वेल 'मोआना 2' आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी हा भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

'मोआना 2' सिनेमाचा काही दिवसांपुर्वीच ट्रेलर भेटीला आला होता.  'मोआना' सिनेमा संपला होता, तेथूनच 'मोआना 2' ची सुरूवात झाल्याचं ट्रेलरमध्ये दिसून येते.  'मोआना 2' हा सिनेमा साहस, विनोद आणि हृदयस्पर्शी कथेचे आकर्षक मिश्रण आहे.यात अप्रतिम ॲनिमेशन असणार आहे. 'मोआना 2'  या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चांगली कमाई करत आहे.

रिपोर्टनुसार, 'मोआना 2' हा चित्रपट कमाईच्या बाबतीत 'इनसाइड आउट 2' ला मागे टाकू शकतो. 'इनसाइड आउट 2' हा  2024 चा सर्वाधिक कमाई करणारा ॲनिमेटेड चित्रपट आहे. 'मोआना 2' ची निर्मिती वॉल्ट डिस्ने ॲनिमेशन स्टुडिओने केली आहे. 'मोआना 2' चे दिग्दर्शन डेव्हिड डेरिक ज्युनियर, जेसन हँड आणि डाना लेडॉक्स मिलर यांनी केले आहे.

टॅग्स :हॉलिवूडभारतसिनेमा