Join us  

शहाजीबापू पाटलांचा बायकोसाठी 'दुष्काळी' उखाणा, स्वप्नील जोशीनेही दिली दाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 12:57 PM

शहाजीबापूंच्या पत्नी रेखाताई पाटील यानी सांगोल्यात त्यांचे स्वागत केले. यावेळी, त्यांनी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. म्हणत डाललॉगबाजी केली

मुंबई/सोलापूर - काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... या आपल्या माणदेशी बोलीतील संवादामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आमदार शहाजी बापू पाटील यांचं त्यांच्या सांगोला या मूळगावी जल्लोषात स्वागत झालं. त्याचप्रमाणे इतरही आमदारांचे त्यांचे मतदारसंघात स्वागत झाल्याचं दिसून आलं. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही गुवाहाटीचे किस्से सांगताना शहाजीबापू पाटलांच्या ओक्केची आठवण करुन देतात. याच शहाजीबापूंनी नुकतेच चला हवा येऊ द्या कार्यक्रमात एंट्री केल्याचं दिसून आलं. त्यामध्ये, त्यांनी पत्नीसाठी खास दुष्काळी उखाणा घेतल आहे. 

शहाजीबापूंच्या पत्नी रेखाताई पाटील यानी सांगोल्यात त्यांचे स्वागत केले. यावेळी, त्यांनी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. म्हणत डाललॉगबाजी केली. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात काही पॉलिटीकल जोड्यांची एंट्री पाहायला मिळाली. त्यात, सांगोल्याचे आमदार आणि शिवसेनेतील बंडखोर नेते शहाजीबापू पाटील हेही त्यांच्या पत्नीसमवेत दिसून आले. या कार्यक्रमात भाऊ कदमने त्यांचा काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील... एकदम ओक्के असा डायलॉग मारला. तर, शहाजीबापूंनीही काय चला हवा येऊ द्या, काय भाऊ कदम, काय डॉक्टरसाहेब... असे म्हणत पुन्हा एकदा गुवाहाटीची आठवण करुन दिली. या एपिसोडमध्ये शहाजीबापूंसोबत त्यांच्या पत्नी रेखा याही हजर होत्या. यावेळी, निलेश साबळे आणि उपस्थितांच्या आग्रहास्तव शहाजीबापूंनी पत्नीसाठी उखाणाही घेतला. 

माझ्या दुष्काळी तालुक्याला पाणी पुरवणाऱ्या नदीचं नाव आहे माण, रेखा माझी जान... असा दुष्काळी भागाची व्यथा मांडणार उखाणा शहाजीबापूंनी घेतला. या उखाण्याला अनेकांना दादही दिली. दरम्यान, चला हवा येऊ द्याच्या याच भागात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील याही त्यांच्या जोडीदारासमवेत दिसून आल्या. 

रेखाताईंनीही घेतला होता उखाणा

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा मला आनंद आहे, आता सगळं ओक्के वाटतंय. आता मलाही घेऊन ते गुवाहाटीला जाणारंय की, असेही रेखा यांनी शहाजीबापूंच्या स्वागतावेळी म्हटले होते. तसेच, आशील तिथं मुलीने नम्रतेने वागावे, शहाजी बापूंसारखा पती मिळाल्यावर देवाकडे आणखी काय मागावे... असा उखाणाही घेतला. तर, अगोदरची परिस्थिती हालाखीचीच होती, अशी आठणही सांगितली. दरम्यान, आमदार शहाजी बापू पाटील यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं. फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगीच्या तालावर कार्यकर्ते सांगोल्यात नाचताना दिसून आले. 

डायलॉगची सोशल मीडियात दिसली क्रेझ

शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. गुवाहाटीत असताना त्यांनी रफीक नावाच्या त्यांच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या मित्राला केलेल्या संभाषणातील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... हे वाक्य तुफान गाजलं. अनेकांनी या डायलॉगवरुन मिम्स आणि गाणीही वाजवली. तर, 15 दिवसांनी त्यांनी मतदारसंघात पाय ठेवले. त्यावेळी, त्यांच्या पत्नी रेखा यांनी औक्षण करुन त्यांचं स्वागत केलं. तर, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... समदं ओक्के, शिंदेसाहेब मुख्यमंत्री ओक्के... असा डायलॉगही मारला. तर, पत्रकारांच्या आग्रहास्तव उखाणाही घेतला.  

टॅग्स :आमदारसांगोलाचला हवा येऊ द्यामुंबईभाऊ कदम