Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतल्या या अभिनेत्रीची भुरळ पडली बॉलिवूडलाही, पाहा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 10:48 IST

एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.  कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. 

एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे.

मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. मिथिलाने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मिथिलाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केले आहे. या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मिथिलाचे सौंदर्या आणखी खुलले आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 

इरफान  खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.  

टॅग्स :मिथिला पालकर